नांदेड। येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित विराट जाहीर सभा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजन करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून हि सभा भव्य दिव्य होणार आहे. सकल मराठा समाजाच्या बांधवांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून असंविधानीक आरक्षणावर दावा मागणारे काही नेते हिंगोली येथे सभा घेऊन मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत, आजच्या सभेत मराठा समाजाला अथवा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केली तर नांदेडच्या याचं सभेवरून सडेतोड उत्तर दिले जाईल यासाठी भव्य दिव्य उत्तर सभेची तयारी नांदेडमध्ये सुरू आहे असा इशारा नांदेड जिल्हा मराठा सेवक श्याम पाटील वडजे व सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे.

नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी 111 एकरच मैदान तयार करन्याचा शुभारंभ आज संविधान दिनी करण्यात आला. तत्पूर्वी सभेच्या नियोजना संदर्भात सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात येऊन चर्चा करण्यात आली, त्यानंतर मातोश्री कॉलेजच्या पाठीमागे, जिजाऊ नगर, लोहा रोड नांदेड येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले आणि श्रीफळ फोडून विराट सभेच्या स्थळाच सपाटीकरण कामाचं भूमिपूजन होऊन मैदान तयार करण्याला 33 जेसीबीच्या साहाय्याने सुरुवात करण्यात आली आहे.

तर 16 ट्रॅक्टर आणि 40 गावातील समाज बांधवांचं योगदान मिळत आहे, सभेला जवळपास 5 लाख मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी सांगितले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,,, एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेला सहकुटुंब उपस्थित व्हावं असं आवाहन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.

नांदेड हिल्ह्यात होणाऱ्या कुठल्याही सभेची तारीख फिक्स झाली नसली तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आली असुन, पुढील दोन दिवसात तारीख निश्चित होईल. अशी माहिती सकल मराठा समाज, नांदेडचे मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version