भोकर। आज दि. १ डिसेंबर रोजी ” जागतिक एड्स दिन ” निमित्त भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय आणि राम रतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता च्या दरम्यान भोकर शहरात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय आणि शिवाजी चौक इथपर्यंत जाऊन ही रॅली पुन्हा त्याच मार्गाने परत येऊन नर्सिंग कॉलेजमध्ये विसर्जित झाली.

यावेळी शाळेतील असंख्य विद्यार्थी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते यात वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण, आयसीटीसी विभाग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ,मनोज पांचाळ, आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, सुरेश डुमलवाड, नामदेव कंधारे, जाहेद अली, सैफ अली, मारोती कठारे, वाहन चालक फणसवाड, राम रतन नर्सिंग कॉलेजचे मंगेश सर व विद्यार्थ्यीनी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version