नांदेड। दिनांक 24.11.2023 रोजी रात्री 21.00 वा. सुमारास तिन महिला प्रवासी नामे कोमल जुगलकिशोर तोष्णीवाल, वैष्णवी तोष्णीवाल रा. हैद्राबाद व नेहा ठाकुर रा. सकोजीनगर नांदेड हया गाडीपुरा नांदेड येथुन निघुन ऑटोने सामान बॅगसह रविनगर कौठा येथे आले होते. आणि ऑटोतुन उतरतांना आपले जवळील पिशवी व त्यात असलेले तिन मोबाईल एकुण अंदाजे किंमती 65,000/-रूपयाचे अॅटोतच विसरले.

ऑटो निघून गेल्यानंतर सदर महिलांना आपली पिशवी व त्यात असलेले तिन मोबाईल अॅटोतच विसरून गेल्याचे लक्षात आल्यांनतर त्यांनी दुसरे मोबाईल वरून आपले अॅटोत विसलेले मोबाईलवर कॉल केला असता अॅटो चालक शेख रियाज यांनी फोन उचलुन सदर महिला यांना बोलले व तुमचे विसरलेले तिन मोबाईल फोन मी आमचे अॅटो संघटनेचे कार्यालय, विमानतळ नांदेड येथे जमा केले आहेत ते तुम्ही तेथुन घेवून जा असे कळविले.

दिनांक 25.11.2023 रोजी टायगर अॅटो संघटनचे अध्यक्ष अहमद बाबा यांनी अॅटोत विसलेले तिन मोबाईल फोन, अॅटो चालक शेख रियाज, आपले सहकारी मुखीद पठाण, मुस्तकीम (गुड्डु भाई), मोहमद साबीर, शेख अहमद, शेख रियाज, शेख ऊबेद यांचे सह पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांची भेट घेवून त्यांना सर्व प्रकार सांगितला व महिलांना पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावले व मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे हस्ते सदर महिलांना मोबाईल परत देण्यात आले व अॅटो चालक शेख रियाज यांना एक हजार रूपये बक्षिस देवून सन्मानित केले. तिनही महिलांनी नांदेड पोलीस दलाचे व अॅटो चालक शेख रियाज व टायगर अॅटो संघटना नांदेड यांचे आभार मानले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version