नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मेळगाव ते धनज ,हुस्सा कडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम  अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून शासनाने लाखो रुपये खर्च करून करण्यात येणारा डांबरीकरणचा रस्ता  किती दिवस टिकेल कांही खरे नाही या करिता सबंधित विभागाच्या अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन धनज ते मेळगाव रस्त्याचे होत असलेल्या कामावर जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी करून रस्त्याचे दर्जेदार काम सबंधित गुत्तेदार यांच्या कडून करून द्यावे अशी मागणी धनज ,मेळगाव ,हुस्सा येथील नागरिकातून केली जात आहे.

नायगाव तालुक्यातील धनज ते मेळगाव ,हुस्सा येथे होत असलेल्या  रस्त्यावर एक इंचाचे डांबर टाकून रस्ता बनवला जात आहे,सदरच्या रस्त्यावर कामाचे नाव ,अंदाजित रक्कम ,काम पूर्ण करण्याचा कालावधी , योजनेचे नाव असलेला फलक लावण्यात आलेला नाही,गावातील अनेक तरुणांनी रस्त्याचे काम योग्य पद्धतीने करावे म्हणून सबंधित गुत्तेदार यांना सांगीतले मात्र कांहीही फरक पडला नाही गुत्तेदार यांच्या मनमानी कारभारामुळे सदरचा रस्ता निकृष्ट दर्जचा होत आहे.परिणामी हा रस्ता किती दिवस टिकेल हे मात्र सांगणे कठीण झाले आहे.

धनज ,मेळगाव या दोनही गावाचे पूर्वसन १९८३ मध्ये झालेले आहे. तेव्हापासून या रस्त्यावर गुडघ्याएवढे खडे पडलेले होते त्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून या रस्त्यावरून जाण्यासाठी जनतेला मोठी कसरत करावी लागली आहे. त्यातच आता डांबरीकरणचा रस्ता  मंजूर झाल्याने रस्ता चांगला होईल म्हणून नागरिकांच्या अश्या पाल्वित झाल्या होत्या मात्र ,गुत्तेदाराच्या मनमानी कारभारमुळे त्यांच्याच मनावर निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्यामुळे भविषात आता  सदरचा लवकर रस्ता होणार नाही त्याकरिता सबंधित विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ जायमोक्यावर येऊन सदर रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण रस्त्याचे काम दर्जेदार (इस्टिमेट प्रमाणे ) करून देण्याची मागणी प्रवाशासह नागरिकातून केली जात आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version