नवीन नांदेड| अखेर वाघळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी सतिश पाटील बस्वदे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी देण्यात आले असून या निवडीबद्दल सिडको परिसरातील आजी माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी नवनियुक्त अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हालचालीना वेग आला होता, अखेर या पदावर सर्वानमुते एकमत झाल्यानंतर नव्याने या पदावर सिडको परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून युवकनेते ,काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले सतिश पाटील बस्वदे यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय माध्यमातून युवा गुप्र माध्यमातून वेगवेगळ्या कार्यात अग्रेसर राहुन युवकासाठी अनेक कार्यक्रम घेऊन पक्ष बळकटी करण्यासाठी परिश्रम घेतले ,काॅग्रेस पक्षाच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग व विकासासाठी केलेल्या कार्याची उल्लेखनिय कार्याची नोंद घेऊन त्यांची वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नानाभाऊ पटोले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, व माजी अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश, यांच्या निर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

वाघाळा ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्ष म्हणून पक्षाच्या ध्येय व धोरणानुसार काम करावे, तसेच सर्व समाजाच्या व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाचे विस्तार करुन पक्ष मजबूत करावे असे नियुक्ती पत्रकात नमूद केले आहे. सदरील नियुक्ती पत्र अमरनाथ राजुरकर माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष तथा महानगराध्यक्ष नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी दिले आहे. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,नांदेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड सभापती संजय लहानकर, मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, माजी नगरसेवक राजु पाटील काळे, ऊदयभाऊ देशमुख, माजी नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड, संजय इंगेवाड,गिरीधर मैड, संदीप कदम, वामनराव देवसरकर,अंबादास रातोळे,प्रितम लिंबेकर यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या निवडीबद्दल सिडको हडको परिसरातील पदाधिकारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version