नांदेड। पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील दिनांक 14/01/2024 रोजी एक 06 वर्ष वयाचे मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाले वरुन पो.स्टे. मुदखेड गुरनं 02/2024 कलम 363 भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयात दिनांक 19/01/2024 रोजी आरोपी दशरथ ऊर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ वय-23 वर्ष, व्यवसाय – मजुरी/सुतारकी रा. रोहिपिंपळगाव ता.मुदखेड जिं. नांदेड अटक करण्यात आली असुन सध्या आरोपी PCR मध्ये आहे.

गुन्हयाचे तपासात आरोपीने त्याचे सोबत गुन्हा करतांना माधव शिंदे हा होता. आम्ही दोघांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. तसेच गुन्हाचे तपासात सदरचा गुन्हा हा दोन आरोपीतांनी मिळुन केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी माधव शिंदे याचा शोध घेत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन आरोपी माधव ऊर्फ मल्या दिलीप शिंदे वय 24 वर्ष रा. रोही पिंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड हा मिळुन आल्याने त्याचे कडे तपास केला असता त्याचा गुन्हात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले व त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली म्हणुन त्यास दिनांक 21/01/2024 रोजी अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीतांनी

संगणमत करुन गुन्हा केला आहे. नमुद गुन्हायाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक श्री खंडेराय धरणे यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक, पोनि श्री उदय खंडेराय, वसंत सप्रे, सपोनि श्री चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, गजानन दळवी, यांनी आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

नमुद गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक हे करत आहेत. वरिल सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version