क्राईमनांदेड

घराचा कुलूप कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने 4 लक्ष 85 हजार 700/-रु चे सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम केली लंपास

नांदेड| शहरातील विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सुर्यदयनगर बी. अँन्ड. सी कॉलनी येथील राशिवाशी व्यापारी घरी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दिनांक 27/12/2023 रोजी रात्री 10.00 वाजेच्या दाराला लावलेला कुलुप तोडून आत प्रवेश करून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे थंडीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून पुन्हा परिसरात अश्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावो अशी मागणी परिसरातील नागरीकातून केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील जुन्या मोटार कार खरेदी विक्रीचा व्यापार करणारे व्यापारी वसीम खान जबीखान पठान वय 32 वर्षे यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून प्रवेश करत चोरी केली आहे. वसीम खान यांनी सांगितल्या प्रमाणे दिनांक 27/12/2023 रोजी रात्री 10.00 वा च्या सुमारास घराचे दाराला कुलुप लावुन गल्लीत बाजुला राहणारे माझे आई वडीलांकडे गेलो. माझी पत्नी दोन दिवसा पूर्वीच दोन मुलीसह माझ्या आई वडीलांकडे गेली होती. त्यामुळे मी आई वडीलांकडे मुक्कामी थाबलो आणि दिनांक 28/12/2023 रोजी सकाळी 06.00 वा चे सुमारास माझे राहते घरी सुर्यदयनगर बी. अँन्ड. सी कॉलनी नांदेड येथे गेलो. तेव्हां माझ्या घराचे दाराचा कोंडा व कुलुप तुटलेले दिसले म्हणून मी दार उघडुन आत गेलो तेव्हां घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. माझे बेडरुम मध्ये कपाटातील ठेवलेले 35,000/- रु रोख रक्कम ठेवलेल्या ठिकाणी दिसले नाही. बाजुच्या रुम मधील कपाटाची पाहणी केली असता कशाने तरी उचकटुन काढलेले दिसले. त्यात खालील वर्णानाचे सोन्या चांदीचे दागीने दिसुन आले नाही.

त्यामुळे माझ्या घरी चोरी झाली असे निदर्शनास आल्याने याबाबतची माहिती विमानतळ पोलिसांना दिली आहे. त्यामध्ये 1 ) सोन्याचा साडेतीन तोळ्याचा गळ्यातील हार किमंती 1,61,000/- रु. 2 ) सोन्याचा हार 04 तोळे 6 ग्रॅम किमंकी /- 2,11,600/-रु 3 ) सोन्याची अंगठी 3 ग्रॅम कि. 13,800/- रु 4) सोन्याचे कानातील रिंग 02 ग्रॅम कि. 9200/- रु 5) सोन्याचे कानातील 06 ग्रॅम फुल कि. 27,600/- रु. 6) चांदीचे पायातील दोन चैन कि, 7000/- रु. 7) पायातील लहान मुलांचे मुलांचे दोन चांदीचे कडे कि. 4000/- रु 8) हातातील लहान मुलांचे दोन चांदीचे कडे 5000/- रु 9) पायातील लहान मुलांचे दोन चैन कि, 2500/- रु 10) चांदीची अंगठी 06 नग कि. 3000/- 11) चांदीचे कानातील वेली कि, 6000/- रु. 12) रोख रक्कम 35,000/- रु 13) पत्नीचे सेंट्रल बैंक ATM, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ब्युटी पार्लरचे साहीत्य, स्पोर्ट रायफल शुटींग जैकेट असे साहीत्य चोरीला गेले आहे.

अज्ञात चोरट्यानी एकूण 4 लक्ष 85 हजार 700/-रु चे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम दाराचे कुलुप व कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन चोरुन नेले आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेवुन त्याचेवर कायेदशीर कार्यवाही करुन माझे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम परत मिळवुन द्यावे. अशी फिर्याद व्यापारी वसीम खान जबीखान पठान यांनी विमानतळ पॉलियाकडे केली आहे. यावरून पोलिसानिया ज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!