दोन वर्षांपूर्वी तुटलेला संसार जुळविला ; ठाण्यातून केली सासरी पाठवणी . सपोनि पवार यांची कामगिरी
उस्माननगर, माणिक भिसे| किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेली . तबल दोन वर्षे पती-पत्नीने एकमेकांचे तोंडही पाहिले नाही त्यात पत्नीने पत्ती आणि सासरच्या मंडळीच्या विरोधात हुंड्यासाठी छेड केल्याचा गुन्हा ही दाखल केला होता. ही बाब उस्माननगरचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना समजल्यानंतर त्यांनी पती-पत्नी आणि दोन्ही कुटुंबीयांना ठाण्यात बोलाविले .
त्यांच्यात खटके उडालेल्या कारणांची माहिती घेत दोघांचेही समुपदेशन केले त्यानंतर पालकत्व स्वीकारत पती-पत्नीला पुष्पहार घालून ठाण्यातून तिची सासरी पाठवणी केली त्यामुळे तुटलेला संसार जुळाला . सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पी. पवार यांनी नुकतेच उस्मानगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे . पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी हद्दीतील गावात असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन गावातील समस्या जाणून घेतल्या ..गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली .
उस्माननगर पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पवार यांनी पती-पत्नी आणि कुटुंबीयांची समजत घातल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून , ठाण्यातूनच मुलींची सासरी पाठवणी करण्यात आली
त्याचवेळी त्यांना दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून तुटलेल्या एका संसाराची माहिती मिळाली . कुष्णूर ता. नायगाव येथील सासरवाडी असलेल्या महिला व चिखली ता.कंधार येथील माहेर असलेले आता ती माहेरीच राहत होती.या महिलेने पतीविरोधात केलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झाला होता . , स.पो.नी. चंद्रकांत पवार यांनी दोन्ही कुटुंबांना ठाण्यात बोलावले त्यांची समजतही घातली. पोलीसांच्या पुढाकारातून तुटलेला संसार जुळल्याने दोन्ही कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी नातेवाईकांच्या साक्षीने पुन्हा पुष्पहार घालून दाम्पत्यास संसाराचा गाडा ओढण्यास शुभेच्छा दिल्या.
पत्ती आणि पत्नीचे नेमक्या कोणत्या कारणावरून खटके उडाली होती ..त्यांची माहिती घेतली. तसेच कुटुंबाची समजूत काढल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही पुन्हा संसार करण्याचा मनोदय व्यक्त केला .त्यानंतर पती-पत्नीने पोलीसांच्या साक्षीने एकमेकाच्या गळ्यात पुष्पहार घालून जीवनाची पुन्हा नव्याने सुरुवात करणार असल्याचे सांगितले स.पो.नि. पवार यांनी पालकांची भूमिका घेऊन महिलेला ठाण्यातून थेट कृष्णूर ता.नायगाव येथील सासरी पाठविले.