प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती स्थापना निमित्ताने हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरात भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन
हिमायतनगर| अयोध्या नगरीमध्ये दि.२२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाल मूर्ती स्थापना निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने भव्य संगीतमय राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
सात दिवस चालणाऱ्या संगीतमय श्रीराम कथेमध्ये हरिभक्त परायण आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज शांतीधाम आश्रम मधापुरी जिल्हा अकोला यांच्या मधुर वाणीतून भाविक भक्तांना रामायण कथा सांगितले जाणार आहे. भव्य रामायण कथा कार्यक्रमाला दिनांक 16 जानेवारी रोजी सुरुवात होणारा असून, दररोज दुपारी एक ते चार या वेळेमध्ये हा कार्यक्रम चालणार आहे.
दिनांक 22 जानेवारी सोमवारी प्रभू श्री राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या धार्मिक व भक्तिमय कार्यक्रम निमित्ताने दि.२१ जानेवारी पासून मंदिर परिसरात आकर्षक विद्दुत रोषणाई केली जाणार असून, 5000 दिवे उजळून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. अशी माहिती मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. या धार्मिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या सर्व सदस्य व हिमायतनगर / वाढोणा गावकरी मंडळींनी केले आहे. त्यांनी केले आहे.