रुग्णालयात उपचारादरम्यान पारवा बुद्रुक येथील घटनेतील अखेर पाचव्या व्यक्तीचा मृत्यू
वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी अचानक रात्री आठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी या अगोदर चार व्यक्तीच्या मृत्यू झाला होता कस्तुरबा गांधी रुग्णालय मुंबई येथे आज उपचारादरम्यान अखेर पाचव्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे गावावर शोक कळा पसरली आहे.
पारवा बुद्रुक येथील बालाजी माने कुटुंबातील या घटनेत पाच व्यक्ती गंभीर रित्या होरपळले होते पाच पैकी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दोन व्यक्तीचा व दिनांक 18 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी चौथ्या व्यक्तीचा मुंबई येथील के एम रुग्णालयात उपचार यादरम्यान मृत्यू झाला होता.
पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घरगुती गॅस सिलेंडरच्या स्पोर्ट होऊन घटनेत जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता बालाजी भीमराव माने कुटुंबप्रमुख व राधाबाई बालाजी माने या दोघा पती-पत्नीचा दरम्यान प्रथम मृत्यू झाला झाला होता.
यांच्या मृत्यूच्या घटनेने गावावर व परिसरावर शोककळा पसरली होती दिनांक 18 सप्टेंबर रोजी सव्वाचार वाजता दोघेही पती-पत्नीवर एकाच सरणावर अंत्य विधी करण्यात आला होता.दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्यांची आई वत्सलाबाई भीमराव माने यांचाही उपचारात दरम्यान मृत्यू झाला होता त्यांच्याही प्रेतालामोठ्या जड अंतकरणाने गावकऱ्यांनी व असंख्य नागरिकांनी नातेवाईकानीअंत्यविधी करण्यात आला होता. दिनांक 23 सप्टेंबर रोजी मुंबई येथील जे जे हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान गजानन बालाजी माने हा जखमी पैकी चौथा व्यक्ती मृत झाला असून, दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेतील उर्वरित एका जखमी व्यक्तीवर मुंबई येथील कस्तुरबा गांधी या खाजगी रुग्णालयात कुमारी संध्या उर्फ मोनिका बालाजी माने या जखमी रुग्णावर उपचार सुरू असताना दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता निधन झाले मुलीच्या निधनाने गावावर पुन्हा एकदा शुभ कला पसरली आहे .दिनांक 7 ऑक्टोबर रोज शनिवारी पारवा बुद्रुक येथे अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी कळवले आहे. आता या कुटुंबामध्ये वयोवृद्ध आजोबा भिमराव माने व विवाहित बहीण असे दोनच व्यक्ती शिल्लक राहिले आहेत.