नांदेड| येत्या सात डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्याची उप राजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन संपन्न होत आहे. या येत्या अधिवेशनात राज्य शासनाच्या दृष्टीने महत्वाचा असा मराठा आरक्षणाचा मुद्दा मंत्री मंडळात प्रामुख्याने चर्चिला जाण्याची व त्यावर निर्णय घेतला जाण्या शक्यता वर्तविली जात आहे. माझ्या मते राज्य शासनाच्या दृष्टीने तित्काच महत्वाचा,जिव्हाळ्याचा व हिताचा दुसरा मुद्दा गरजवंत, उपेक्षित तथा वंचित ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनाचा प्रलंवबित प्रश्न आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी आमदारकीच्या व केंद्र शासनासाठी खासदारकीच्या सार्वजनिक निवडणुका पुढच्या वर्षीच लगेचच होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक समूह हा एकून लोक संख्येच्या आठरा टक्के इतका आहे.प्रत्येक कुटूंबात एक ते चार(स्वतः/पत्नी/दोघेही,आई/बाबा/दोघेही) ज्येष्ठ नागरिक आहेत.एक ज्येष्ठ नागरिक हा किमान सहा मतांचा (स्वतः,पत्नी,मुलगा,सुन,लेक तथा जावाई)हुकमी एक्का(राजा)आहे. ज्येष्ठ नागरिक समूह हा आता जागरूक व संघटित झाला आहे. हा एकवट्ट समूह ज्यांच्या पारड्यात पडेल ते पार्डे जडच होणार आहे यात तिळमात्र शंका नाही. ज्येष्ठ नागरिक हा अनूभवी मतदार आहे.

तो कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा,विश्वासार्ह्य, तथा शंभर टक्के मतदानात भाग घेणारा समूह आहे. शेजारिल आंध्र प्रदेश, कर्णाटक, तेलंगाना, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तरांचल अदि सर्व राज्यांत ज्येष्ठ नागरिकांनां 2000 ते 3000 रू प्रतिमहा मानधन दिले जाते. पण सुबत्ता व क्षमता असूनही या फुले, शाहू, अंंबेडकर,तथा यशवंतरावजींचा वसा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात शासन ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष्य करते आहे ही अत्यंत खेदजनकच नव्हे तर संताप जनक बाब आहे.

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा तथा समाज मनाचा आरसा आहे.ज्येष्ठ नागरिक समूह हा वैचारिक दृष्ट्या पोक्त आहे.तो शासन कर्त्याला संविधानिक मार्गानीच अनेक वर्षा पासून न्याय मागतो आहे.त्यांच्या न्याय मागण्यांचा विचार करण्यात व मागण्या मान्य करण्यातच शासनाचे भले व लौकिक आहे.या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्या बरोबरच ज्येष्ठांच्या 3500/-रू प्रतिमहा मानधनाचा हा प्रलंबित मुद्दाही अधिवेशनात चर्चिला जावा व मानधन मान्य करण्यात यावा.आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांनां सरसकट मानधन नको पण गरजवंत,वंचित, उपेक्षित,शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी, कामगार ज्येष्ठ महिला पुरूष,विधवा ज्येष्ठ नागरिकांनां प्रतिमहा किमान 3500/- रू फक्त देण्यात यावेत एवढेच.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version