नांदेड| नांदेड तालुक्यातील सोमेश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या सप्ताहाचे 12 वे वर्ष सुरु झाले असून सोमनाथ मंदिर गोदावरी काठी जुनी मंदिर सोमेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तसेच लक्ष्मणशक्ती श्रवण सोहळा आजपासून प्रारंभ झाला असून या मंदिराची 400 वर्षांची परंपरा आहे.

या मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मोठ-मोठ्या महाप्रसादाचे गावकर्‍यांतर्फे आयोजन केले जाते. तसेच आज होणार्‍या सप्ताहास श्री 1008 महंत जीवनदास महाराज चुडावा व श्री महंत 1008 राम भारती गुरु मारोती भारती महाराज मोहनपुरा यांच्या कृपा आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायण व श्रीमद् भागवत कथा तसेच लक्ष्मणशक्ती श्रवण सोहळा आमचे प्रेरणास्थान ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यंाच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे आयोजिले आहे.

पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 10 श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण, श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते श्री ह.भ.प.प्रल्हाद महाराज ढोले शेगाव जि.बुलढाणा, 11 ते 4 भागवत कथा, दु.4 ते 6 भोजन पंगत, सायंकाळी 6 ते 8 हरीपाठ, रात्री 8 ते 10 भावार्थ रामायण व नंतर हरीजागर. 20 फेब्रुवारी रोजी अन्नदाते किशोर राजाभाऊ देशमुख, 21 रोजी बाबुराव नामदेवराव बोकारे, 22 रोजी गंगाधर पिसाळ, 23 रोजी कमलबाई बोकारे, 24 रोजी एकादशीचा फराळ बालाजी भुजाजी बोकारे, 25 रोजी मनोजकुमार सुधाकर लांबडे औंढा नागनाथ आणि प्रकाश सखाराम पंत पाटील, 26 रोजी गोपीनाथ बोकारे यांच्याकडून फराळ. सायंकाळी महाशिवरात्रीनिमित्त भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होईल.

भागवत कथेची सांगता 27 फेब्रुवारी रोजी ह.भ.प.ऍड.यादव महाराज वाईकर यांच्या काल्याचे किर्तनाने होईल. काल्याची पंगत बालाजी रामराव हंडे नाहदकर व भागवत कथा प्रवक्ते प्रल्हाद महाराज ढोले शेगावकर यांच्या गोड वाणीतून सात दिवसाच्या भागवत कथेचे आयेाजन केले आहे. गावकर्‍यांच्या वतीने दररोज येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी माहिती सोमेश्वर गावकरी मंडळी व पत्रकार आनंदा बोकारे यांनी केली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version