नवीन नांदेड। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सिडको नवीन नांदेड भागातील काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी यांनी सदैव साहेबा सोबत तर साहेब निर्णय जाहीर केल्या नंतर अशा प्रतिक्रिया आजी माजी लोकप्रतिनिधी, काँग्रेस पक्षाच्या विविध प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जाहीर केल्यामुळे सध्यातरी अनेक पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असुन साहेबाच्या निर्णय नंतर प्रतिक्रिया देऊत अशी भुमिका घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आमदरीकाचा राजीनामा सभापती नार्वेकर यांच्या कडे सादर करून काँग्रेस पक्षाच्या राजीनामा काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे १२ फेब्रुवारी रोजी दिल्यानंतर वृतवहिनीवरून सदरील वृत प्रसारित झाले. नवीन नांदेड भागातील व नांदेड दक्षिण तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नावामनपा मधील आजी माजी लोकप्रतिनिधी, यांच्या सह काँग्रेस पक्षाच्या विविध संघटना असलेल्या अनेक पदाधिकारी यांनी सदैव साहेबा सोबत असल्याचा प्रतिक्रिया दिल्यातर अनेक पदाधिकारी यांनी साहेबांनी निर्णय जाहीर केल्यानंतर सांगण्यात येतील अशा प्रतिक्रिया भम्रघ्वनीवरून दिल्या आहेत.

नांदेड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, नांदेड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.ललिता शिंदे, माजी बळीरामपुर जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, माजी नगरसेवक राजु पाटील काळे, ऊदय देशमुख,सिध्दार्थ गायकवाड, यांच्या सह अनेकांनी साहेबा सोबत असल्याचे जाहीर केले.

तर काही पदाधिकारी दोन दिवसाच्या निर्णय नंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भुमिका जाहीर करणार असल्याने अनेकांनी काँग्रेस पक्ष का साहेब सोबत हे जाहीर करणे टाळले असले तरीही नवीन नांदेड भागासह , दक्षिण भागातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे साहेबा सोबतच असतील असे बोलल्या जात आहे. ग्रामीण भागात अशोकराव चव्हाण यांना माननारा मोठा गट असून सरपंच, उपसरपंच, सदस्य, कृऊबासमिती सह अनेक पदावर पदाधिकारी असल्याने काँग्रेस पक्षाला मोठया प्रमाणात खिंडार पडणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version