हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री गोळूसेठ पिंचा व सौ. शारदा पिंचा यांनी घरची हालाकीची परिस्थिती असताना देखील मागील 20 वर्षांपासून अहोरात्र शिलाई काम करून मुलाला शिकविले आहे. त्यांच्या अथक परिश्रम व भावेशची शिक्षणा विषयी असलेली इच्छशक्ती व कठोर परिश्रम घेऊन गेल्या अनेक वर्षेपासून सिएच्या परीक्षेची तयारी केली.आणि औरंगाबाद येथे राहून परिश्रम करत मागील नोव्हेंबर 2023 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA) ची परीक्षा दिली होती.
मेहनत आणि आई वडिलांचे कष्ट या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून भावेश पिंचा यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परीक्षा देऊन चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत यश संपादन केले आहे. नुकताच म्हणजे दि 09 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात भावेशचे CA होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने मिळविलेल्या यशामुळ आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असून, निकाल लागताच कंपनीने जॉबसाठी ऑफर केली असल्याचे भावेश पिंचा यांनी सांगितले आहे.