नांदेड। नांदेडच्या गुरुद्वारातर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या आगळा वेगळा भव्य पावन “तखतस्नान” सणाकडे शहर प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्यावेत. जगप्रसिद्ध अशा या सणाची उपेक्षा होऊ नये याची काळजी घेण्यात यावी. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी येथे प्रसिद्धी पत्राकान्वय केले आहे.

रवींद्रसिंघ मोदी यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, नांदेडच्या तखत सचखंड श्री हजुरसाहिब गुरुद्वारात दरवर्षी दीवाळी आणि गुरुतागद्दी श्री गुरुग्रंथसाहेब या सणापुर्वी ऐतहासिक आणि पारंपरिक सण “तखतस्नान” साजरा केला जातो. तखतस्नान सणात स्थानीक भविकांसह देशविदेशातून 20 ते 25 हजार भाविक सहभागी होतात. वरील सणाचे वैशिष्ट्यै असे आहे की, या दिवशी भाविक सामूहिकरित्या गुरुद्वारा इमारतीची आणि ऐतहासिक शास्त्रांची स्वच्छता करतात.

सर्व भाविक गोदावरी नदीतून पाणी आणून गुरुद्वाराची स्वच्छता सेवा करतात. तीन फेर्याकरून भाविक सण साजरा करतात. वर्षानुवर्षे तखतस्नानची परंपरा येथे पाळलीं जात आहे. तखतस्नान सण हे भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा सुप्रसिद्ध आहे. या सणाची प्रसिद्धी वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आणि शोशल मिडियावर केले जाते. पण नांदेडच्या शहर प्रशासनाला तसेच जिवन प्राधिकरण विभागाला या सणाविषयी जागरुकता नसावी असू चित्र येथे पहायला मिळत आहे. तखतस्नान सण गोदावरी नदीवर नगीनाघाट ठिकाणी साजरा केला जातो. हजारोंच्या संख्येत भाविक गोदावरीतून जल भरतात व पावन पाण्याने गुरुद्वाराची इमारत स्वच्छ करतात. पण गोदावरी नदीत फूटलेल्या गटारांचे व नाल्यांचे पाणी मिसळत आहे. नगीनाघाट ते बंदाघाट पर्यंत गोदावरी घाट स्वच्छ असायला पाहिजे पण अद्यापही प्रशासनाने स्वच्छता कार्य हाती घेतलेले दिसत नाही आहे.

तखतस्नान सणात महानगर पालिका प्रशासन, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, पाटबंधारे विभाग, विद्युत मंडळ, पोलीस विभाग यांचे सहकार्य गरजेचे असते. वरील विभागांनी गुरुद्वारा बोर्डाच्या समन्वयाने आपली कर्तव्य पार पाडून शहराचे नावलौकिक करणाऱ्या या अंतर्राष्ट्रीय ख्यातिचे सण साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. नुक्तीच शोशल मिडियावर गोदावरी नदीत विसर्जित होत असलेल्या मोकळ्या गटाराच्या पाण्याचे व अस्वच्छतेचे चित्र प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यानंतर स्थानीक शीख समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. मनपा आयुक्त आणि प्राधिकरण विभागाच्या आयुक्तांनी तखतस्नान सणाची उपेक्षा होऊ नये याची दक्षता घ्यावी असेही रवींद्रसिंघ मोदी यांनी विनंती केली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version