श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातील बस स्थानका जवळ असलेल्या राजश्री लॉज मध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी जोडप्याला कोणत्याच रजिस्टरला नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले असून माहूर पोलिसांनी काल दि ८ मंगळवार रोजी राजश्री लॉज चे मालक गणेश जोशी व कर्मचारी अनिल माधव गंजेवार यांच्या विरुद्ध कलम २३३/३ ५ बीएनएस प्रमाणे कायदेशीर कार्यवाही केली आहे.या कार्यवाही ने माहूर शहरातील त्या प्रसिद्ध निवडक लॉज व हॉटेलांमध्ये अवैध व्यवसायासह अवैध जोडप्यांच्या गैरकृत्याला चालना देणाऱ्या चालकामध्ये धडकी भरली आहे.

माहूर हे तीर्थक्षेत्राचे व तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे भाविकासह शिक्षणासाठी तसेच बाहेर गावाहुन कामानिमित्ताने येथे येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर महाविद्यालयांसह शाळा असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा नित्य वावर असतो. तसेच दररोज हजारो लोक याच रस्त्यावरुन ये-जा करीत असतात,विदर्भातील आर्णी व पुसद या शेजार च्या तालुक्यातून देखील प्रेमीयुगल देखील येथील लॉजसमध्ये येवून मज्जा करीत असल्याची चर्चा होती.विशेष म्हणजे रुमसाठी आधारकार्ड पुरावा म्हणून घेण्यात येत नसल्याने हॉटेल चालकाला रूम भाडे दाम दुप्पट मिळत होते.काही ठिकाणी तर अवैधरीत्या देहविक्री व्यवसायासाठी बाहेरगावाहुन तरुणीना आनले जात असल्याची देखील कळते,या प्रकरणाने शहर आणि तालुक्यातील पालकांमध्ये चिंता पसरली होती.

अशातच काल मंगळवारी माहूर पोलिसांनी भरवस्तीतील राजश्री लॉज वर धाड टाकली असता एका रूम मध्ये एक २४ वर्षीय मुलगी तर दुसऱ्या रूम मध्ये २६ वर्षीय मुलगी व ३० वर्षाचा युवक मिळून आला.त्यांचे आधार कार्ड चेक करून चौकशी केली असता त्यांनी देवदर्शासाठी माहूर ला आल्याचे सांगितले.मात्र राजश्री लॉज चे मालक गणेश जोशी व कर्मचारी अनिल माधव गंजेवार यांनी राजश्री लॉज येथे रूम बुकिंग रजिस्टर मध्ये नोंदी न करता ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून देऊन शासकीय लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोघा विरुद्ध कलम २३३/३ ५ बीएनएस प्रमाणे कायदेशीर कार्यवाही कारवाई करण्यात आली आहे.

ही कार्यवाही पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप अन्येबोइनवाड,गजानन चौधरी गजानन जाधव, ज्ञानेश्वर खंदाडे,संग्राम पवार, महीला पोहेका पुष्पा पूसनाके, सरोजिनी जाधव, शिल्पा राठोड,सारिका राठोड, शिवनंदा जाधव, सोनू भुरके,नीलम जाधव, मनीषा राठोड, सरोजनी जाधव यांनी केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version