नांदेड। अॅटोमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीतांना 12 तासाचे आत अटक करून वजीराबाद गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे, तसेच या कामगिरीत 53,900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 30.05.2024 रोजी जयवंत श्रवण चव्हाण रा. कासारपेठ तांडा देवठाणा ता. भोकर हे आपले मुलीला दवाखाण्यामध्ये दाखविण्यासाठी आले असतांना त्यांना एका अॅटोचालकाने अॅटोमध्ये बसवून डॉक्टर लाईनकडे आणीत असतांना अॅटोमध्ये बसलेल्या ईतर दोन प्रवाशांनी त्यांचेसोबत गर्दी होत असल्याचा बहाना करुन त्यांचे खिशातील नगदी 10,000/- रुपये चोरी केले. सदर व्यक्तीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन गु.र.न. 240/2024 कलम 379,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करणेबाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री. किरतीका एम.एस. सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग नांदेड शहर यांनी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना सुचना दिल्या.

सदर सुचनाप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी, आर.डी. वटाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोहेकॉ/ 2083 दत्तराम जाधव, पोना शरदचंद्र चावरे, पोकों/बालाजी कदम, पोकॉ रमेश सुर्यवंशी, शेख ईम्रान, पोकों/अंकुश पवार, पोकों/मेघराज पुरी, पोकॉ भाऊसाहेब राठोड यांनी आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीने केलेल्या प्रवासा दरम्याणचे सर्व सिसिटीव्ही फुटेज पाहुन अॅटोचा नंबर ट्रेस केला.

त्या आधारे अॅटोचालकाचा पत्ता लागल्याने अॅटोचालक रवी गणेश रगड, रा. तेहरानगर नांदेड यास पकडुन त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांचे ईतर दोन साथीदाराचे मदतीने फिर्यादीचे 10,000/- रुपये चोरी केल्याचे कबुल करुन त्याचे हिश्याला आलेले 3,900/- रुपये काढुन केले. त्याचेकडुन गुन्हयात वापरलेला अॅटो किंमती 50,000/- रुपयाचा असा एकुण 53,900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीस गुन्हयाचे तपासीक अंमलदार पोहेकॉ/11 शरद सोनटक्के यांनी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीची एक दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन उर्वरीत दोन आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येत आहे. अॅटोमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीतांना 12 तासाचे आत पकडण्यात आणल्याने वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version