हदगाव| तालुक्यात काही दिवसापुर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नव नियुक्ती सदस्य समिती स्थापन करण्यात आली असुन, त्या समितीमध्ये तालुक्याचे आमदार, दिव्यांगासाठी काम करणारी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संघटनेचे एक अशासकीय प्रतिनिधी, दिव्यांग व्यक्ती, महिला व सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता आणि ज्येष्ठ नागरिक व इतर समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती आणि शासकिय प्रवर्गातील गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आणि तहसिलदार असणे बंधनकारक असते. व तसेच शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विसयो 2018/प्र.क्रं 62/ विसयो दिनांक 20.08.2019 रोजीच्या शासन निर्णया नुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नव नियुक्ती सदस्य समिती स्थापन करण्यात आली नाही. आणि शासन निर्णया नुसार हदगाव तहसिल मधील संजय गांधी निराधार योजनेतील नव नियुक्त समितीमध्ये अशी एक ही व्यक्ती वरील प्रमाणे सदस्य नाहीत. असा निवेदन जिल्हा व तालुका प्रशासनाला दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी दिला आहे.

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दिव्यांग विकास संघर्ष समिती ही संघटना शासन मान्य व शासन नोंदणीकृत आणि नामांकित व सर्वांना प्रचलित समिती आहेत. व तसेच दिव्यांग विकास संघर्ष समिती हि दिव्यांग व्यक्ती, विधवा, तृतीय पंत, अनाथ मुले, वयोवृद्ध निराधार व्यक्तीसाठी हि समिती अनेक वर्षांपासुन कार्यरत आहेत. या समिती मार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व गरजु दिव्यांग व्यक्ती, विधवा, वयोवृद्ध निराधार व्यक्तीची शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणुन त्यांचे विकास करण्याचे काम सदरील दिव्यांग विकास संघर्ष समिती मार्फत चालु आहेत. आणि संजय गांधी निराधार योजना ही दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध निराधार व्यक्तीसाठी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकासाची जिवन संजीवनी योजना आहे. व तसेच दिव्यांगाचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने संजय गांधी निराधार योजना शासन तर्फे राबविले जाते. पण हदगांव येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मध्ये दिव्यांग विकास संघर्ष समितीचा अशासकीय सदस्य व दिव्यांग व्यक्तीचा समावेश न केल्याने दिव्यांग व्यक्तीत तिव्र नाराजगी पसरली आहे.

सदरील नव नियुक्ती समिती तात्काळ रद्द करुन नविन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मध्ये दिव्यांग विकास संघर्ष समितीचे सदस्य व दिव्यांग व्यक्तीचा समावेश करावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय हदगांव समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केला आहे. त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, मारोती भुंजगा लांडगे, निहाल पटेल, रमेश गोडबोले,फारुख कुरेशी, अहमद भाई, गजानन शिंगणे,खलील खान ,प्रियंका राठोड, शब्बीर बेग,आधीसह यावेळी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version