अब सुमीरन करले मना हरी सो नाम बंदिशीने दिवाळी पहाट-2023 ची सांगता

श्वेता देशपांडे यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। स्थानिक जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड व नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या दिवाळी पहाट-2023 या कार्यक्रमाची सुरेल सांगता 15 नोव्हेंबर रोजी झाली.

कबीर वाणी या कार्यक्रमाद्वारे जीवनाचा आशय संपन्न करणाऱ्या एकाहून एक सरच रचना श्वेता देशपांडे यांनी सादर केल्या. भाटियार रागाने त्यांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात अधिक गोडवा निर्माण केला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

शास्त्रीय, उपशास्त्रीय संगितासमवेत दादरा गीत शैलीत कबीरांची भजने भेटीला दिली. कबीरासमवेत संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली यांची अभंग त्यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना संवादिनीवर ज्ञानेश्व सोनावणे आणि तबल्यावर मणी भारद्वाज यांनी साथ संगत दिली. पंकज शिरभाते यांनी व्हायोलीनवर साथ देऊन रंगत चढवली. श्रीकांत उमरीकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. सायंकाळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना सृष्टी जुन्नरकर यांनी सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!