नांदेड

महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

नांदेड| राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर, विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.

सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन व पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड . दुपारी 1.15 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या आढावा व समन्वय बैठकीस उपस्थिती. (अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा.

नुकसानीच्या अनुषंगाने ई पिक पाहणी, पिकविमा आढावा. गौण खनिज आढावा. वहिवाट रस्ते, पाणंद रस्ते. लम्पी आढावा) स्थळ: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . दुपारी 3 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.40 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंह जी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.50 वा. श्री. गुरु गोविंद सिहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. सायंकाळी 4 वा. विमानाने अकोला कडे प्रयाण करतील.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!