राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या : अभिजित राऊत; ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येवू घातलेल्या समस्या कोणत्या आहेत याचाही प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोईचे व सोपे होते, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात केले आहे. प्रशिक्षणाच्या सुरुवातीस अभिजित राऊत यांचे विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी स्वागत केले व प्रशिक्षणाचे प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर ललितकुमार व-हाडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा संघ तथा उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसिलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार स्विप्नील दिगलवार उपस्थित होते.

श्री गुरूग्रंथ साहीब भवन येथे दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात विकास माने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु करण्यापासून समाप्त होण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले. यामध्ये ई.व्ही.एम.,व्ही.व्ही.पॅट यासंबंधी अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. विविध अर्ज कसे भरतात, कोण-कोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सूध्दा प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुस-या टप्पयात ई.व्ही.एम. व व्ही‍.व्ही,. पॅटचे प्रत्यक्ष हाताळणी बाबतचे प्रशिक्षण देण्यांत आले. यामध्ये ई.व्ही‍.एम. ची जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सर्व क्षेत्रिय अधिकारी, मतदान अधिकारी, कर्मचारी, मास्टर ट्रेनर, मंडळ अधिकारी अश्या विविध अधिकारी व कर्मचारी यांना पी.पी.टी. व्दारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्य, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

ई.व्ही.एम. यंत्रात तांत्रिक दोष आढळल्यास त्याचे निराकरण कसे करावे हे चर्चेव्दारे शंका निरसन करण्यात आले. याच प्रशिक्षणात टपाली ई.डी.सि. मतपत्रिका बाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक कर्तव्यावर राहून सूध्दा मतदान करता येईल ही जाणीव करून देण्यात आली. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन राजेश कूलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकूमार कोटूरवार, बालाजी जाधव, संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बाबूराव जाधव, शेख जमील व महमद आखीब तथा निवडणूक विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल; विविध विभागांचा आढावा
खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज त्यांनी विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवाराच्या व राजकीय पक्षाच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१-मुखेड या तीन विधानसभा क्षेत्रातील खर्चावर निरीक्षण ठेवण्याची जबाबदारी मगपेन भुतिया यांची आहे. मगपेन भुतिया हे देखील शासकीय विश्रामगृह येथे निवासी असून त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये खर्चाच्या संदर्भातील कुठल्याही तक्रारी गाऱ्हाणी व सूचनांसाठी संपर्क साधता येऊ शकतो त्यांचा दूरध्वनी क्रमांक 8902196177 आहे. नागरिकांनी निवडणूक संदर्भातील कामांसाठी त्यांना गरजेनुसार माहिती देण्याच्या आवाहनही त्यांनी केले आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून यापूर्वीच डॉ. दिनेश कुमार जांगिड हे दाखल झाले आहेत.

 

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!