नांदेडराजकिय

आ.जवळगावकराच्या तिन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला आलंय यश….

हिमायतनगर| हिमायतनगर शहरांत आदिवासी मुलांचे आणि आदिवासी मुलींचे वसतिगृह मंजुर झाल्यापासून आज पर्यंत भाड्याने खाजगी इमारतीमध्ये आहे.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सुरूवातीला घारापुर रस्त्यावरील गायरान जमीन वस्तीगृहासह क्रीडा संकुल साठी शासनाकडून ताब्यात घेतली होती.सुदैवाने वस्तीगृहाच्या बांधकामांसाठी मुलांचे वसतिगृह १२ कोटी आणि मुलीच्या वस्तीगृहासाठी १२ कोटी असे २४ कोटी तर तालुक्यातील तीन मंडळासह १८ तलाठी कार्यालयासाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आगामी वर्षात शासकीय हक्काचे वसतिगृहात विद्यार्थी विद्यार्थ्यीनीना ऊपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

सदर वृत्त आदिवासी बांधवांना समजताच आदिवासी बांधवांनी आ जवळगावकर यांच्या वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हिमायतनगर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना डॉ.प्रकाश मारुडवार यांच्या बोरगडी रस्त्यांवरील ईमारती मध्ये वस्तीगृह चालू आहे.शासकिय आदिवासी मुलींचे वसतिगृह प्रविण मामीडवार यांच्या ईमारती मध्ये सुरू आहे.मुला -मुलीचे वस्तीगृहासाठी शासनाने जागा देऊन शासकीय आदिवासी वस्ती गृह ऊभे करावे अशी अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांनी मागणी केली होती. शासकिय वस्तीगृहासाठी घारापुर शिवारातील गायरान जमीन संपादित करण्यासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन उपविभागीय अधिकारी,सध्याचे नांदेड जिल्ह्यांचे अप्पर जिल्हाधिकारी महेश वडदकर, किनवटचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी जायमोक्यावर जाऊन गायरान जमीनीची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविला होता.पुन्हा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शासनाकडे जमीन संपादनासाठी पाठपुरावा केला होता.सुदैवाने काही महिन्यांपूर्वीच जमीन शासकीय आदिवासी मुलांच्या आणि मुलींच्या वस्तीगृहासाठी जमीन संपादित करण्यात आल्याचे शासनाने जाहीर केले होते. शासकीय आदिवासी मुलांच्या आणि मुलींच्या वस्तीगृहासाठी जमीन संपादित झाल्यानंतर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वस्तीगृहाच्या बांधकामांसाठी निधी उपलब्धतेसाठी सारखा पाठपुरावा केला होता.

त्याच्या परीश्नमाला फलश्रुती मिळाली असुन दोन्ही वस्तीगृहाच्या बांधकामांसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.सदर वार्ता हिमायतनगर तालुक्यात समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती खोबाजी वाळके,चिचोर्डी चे सरपंच गंगाराम ढोले, संदिप झळके, परशुराम ढाले, एकघरी चे सरपंच सौ ज्योतीताई सुनील शिरडे,दरेसरसम चे ऊपसरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराव भिसे, पवना येथील सरपंच सौ विमलबाई शेषराव हुरदुके,पोटा बु येथील ऊपसरपच माधवराव डोखळे , विश्वनाथ वानोळे , विठ्ठल गोबाडे, सत्यनारायण डोखळे, पंडीत गोबाडे,रघुनाथ बेले, बंडोपंत बुरकुले, किशोर धुमाळे, रामदास वाळके, कार्ला ऊपसरपच रोशन धनवे, रामाजी मिराशे, कैलास डुडूळे यांच्या सह आदिवासी पालकांसह विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी कडून आभार मानले जात आहेत.

तिनं मंडळात तिन मंडळाधिकारी कार्यालय तर अठरा सज्यात १८ तलाठी कार्यालयास निधी मंजूर…
तालुक्यात हिमायतनगर,सरसम बु, जवळगाव असे तिन महसूलचे मंडळ आहेत.तिन्हिही मंडळात तिनं मंडळाधिकारी कार्यालय तर हिमायतनगर मंडळ कार्यालया अंतर्गत हिमायतनगर, धानोरा ज, श्नीक्षेत्र बोरगडी, जिरोणा, सिरजनि, पळसपुर येथे तलाठी कार्यालयास निधी मंजूर झाला आहे. सरसम बु महसूल मंडळ अंतर्गत सरसम बु, सवना ज, दरेसरसम,दुधड, खडकी बाजार, आदेगाव आणि जवळगाव मंडळात जवळगाव,कामारी,पोटा बु, विरसनि, वटफळी, कांडली बु अशा तीन मंडळाधिकारी कार्यालय, अठरा तलाठी कार्यालयासाठी ६ कोटी रुपये ७ डिसेंबर रोजी निधी मंजूर झाला आहे.प्रत्येक सज्यात तलाठ्यांसाठी कार्यालय आणि मंडळाधिकारी कार्यालय होणार असल्याने भविष्यात गीरदावार आणि तलाठी आपल्या सज्यावर भेटण्याचे संकेत आहेत.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने तलाठी आपल्या सज्यावर भेटणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!