कुख्यात गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार वेग, रा. खडकपूरा नांदेड यास मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे केले स्थानबंध्द 

एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत पोलीस ठाणे वजीराबाद येथील तीसरी कार्यवाही

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग ईतवारा नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, एमपीडीए., हद्दपारी सारख्या विविध प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथील कुख्यात गुंड ईश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले रा. चिखलवाडी कॉर्नर नांदेड, मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफार बेग रा. खडकपूरा नांदेड यांचेविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कारवाही करण्यात आली. ज्यामध्ये मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रस्तावाचे अवलोकनकरुन सदर गुन्हेगारांविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असल्याने सदर गुन्हेगारांना छत्रपती संभाजी नगर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.

वरीष्ठांच्या सुचनांप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, आर. डी. वटाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथील अभिलेखावरील क्रियाशिल गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग, वय 34 वर्षे व्यवसाय बेकार हा खडकपूरा नांदेड याचा अभिलेख पाहणी केला असता त्यांचेविरुध्द बेकायदेशिररित्या स्वतः जवळ शस्त्र बाळगणे, दंगा करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे, खंडणी मागणी करणे, खंडणी न दिल्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, साधी व गंभीर दुखापत करणे, चोरी व जबरी चोऱ्या करणे, रात्री अपरात्री चोरी करण्याचे उद्देशाने फिरणे अशा विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याचा अभिलेख आढळुन आला.

सदर गुन्हेगारांकडुन वारंवार गुन्हे घडुन नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजीक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्याने त्याचेविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबतचा अधिनियम 1981 (सुधारणा 2015) चे कलम 3 (1) (MPDA) अन्वये प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्फतीने मा. जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला.

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नांदेड यांनी प्रस्तवाचे अवलोकन करुन यातील गुन्हेगाराविरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पाहुन त्यास नमुद कायद्यान्वये स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर याठीकाणी दाखल करण्याचे आदेश निर्गमीत केले.

सदर आदेशाप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, आर. डी. वटाणे, सहा. पोलीस निरीक्षक, बालाजी किरवले, पोउपनि तसेच पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, अंकुश पवार, भाऊसाहेब राठोड, मेघराज पुरी, शेख ईम्रान यांनी नमुद स्थानबध्द ईसम यास ताब्यात घेऊन त्यास मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर याठीकाणी स्थानबध्द केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!