शनि मंदिर देवस्थान येथे शनि जयंती निमित्ताने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

नवीन नांदेड। श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड २१वा श्री शनि जन्मोत्सव ६ जुन २०२४ रोज गुरुवार सकाळी ६:३० वा ५१ किलो तेलाचा अभिषेक गुरु शशिकांत महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न होईल.
शके १६४५ वै. वद्य अमावस्या दि. ६ जुन २०२४ रोज गुरुवार आयोजीत कार्यक्रमात खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. ६ जून २०२४ गुरुवारी सकाळी ६:३० वा. सामुदायीक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. पुजेचे मानकरी श्री शनि जन्मोत्सवाचे अजीवन अन्नदाते हृदय रोग तज्ञ मा. डॉ. कर्मवीर उनग्रतवार यांच्या व इतर अभिषेकाचे यजमान यांच्या हस्ते ५१ किलो तेलाचा अभिषेक करण्याचा संकल्प आहे. अभिषेक पूजा, श्री हानुमान चालीसा, व श्री शनि चालीसा, आरती नंतर सौ.रेखा डॉ. कर्मवीर उनग्रतवार यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवस्थान तर्फे शाल, श्रीफळ, पीस हाराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
श्री शनि जन्मोत्सव आजिवन अभिषेक यजमान गजेंद्र संतुकराव देशपांडे, माधव ज्ञानोबा कदम,चि.वैभव प्रभाकरराव बचाटे,प्रकाश पांडुरंगराव शिंदे,आदित्यनाथ अबादास मुनगीलवार, बालाजी नारायण रुद्रावार, यशप्रित संजीव कुमार निंजलिगे, संजय ग्यानोबा काळे,अनंत विश्वनाथराव बोबडे, श्रीकांत शेषशेराव देशपांडे, अच्युत वासुदेव कुलकर्णी,रमेश विश्वनाथ शिंदे,विकास तेलगावकर,अजय रत्नाकरराव वझरकर,सदाशीव नाथराव बंडेवार,प्रफुल बाबुराव कांडलकर हे आहेत.
या शनि जन्मोत्सव सोहळ्यात जास्ती जास्त भाविकांनी सहभागी असे आवाहन विश्वस्त करणसिंह ठाकुर (सिडको भुषण) अध्यक्ष, गोपिनाथराव कहाळेकरकोषाध्यक्ष,माधवराव कदम सेक्रेटरी,संजय जाधव पाटील बांधकाम प्रमुख आर. किशनराव, बाळासाहेब चव्हाण, त्र्यंबक सरोदे, दत्तात्रय सागुरे, कै. गोविंद मेटकर, शिवाजी आढाव देवबा कुंचेलीकर, प्रा. अशोक मोरे, निवृत्तीराव जिंकलवाड, किशोर देशमुख, खुशाल कदम यांनी केले आहे.
