नांदेड| मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात त्याचे तीव्र प्रसाद उमटत होते.असे असताना शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडत असल्याने या घटनात वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्यात इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या कोमल तुकाराम बोकारे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात पाचवा बळी गेला आहे.
नांदेड तालुक्यातील सोमेश्वर येथील इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या कोमल तुकाराम बोकारे या मुलीने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरात चिट्टी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल चे वडील हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांना फक्त एकच एकर शेती आहे. आणि एकुण पाच मुली असून, मुलगा नाही. हा प्रकार लक्षात येताच अघरच्यांना धक्का बसला आहे, अगोदरच अल्प शेती त्यातही अतिवृष्टीने झालेलं नुकसान यामुळे कुटुंबाची वाताहत होत होती. आज मुलीने अचानक घरात चिट्ठी लिहून ठेऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठा समजलं आरक्षण लवकर द्यावं….. माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये…. आणि अण्णा मला माफ करा… तुमची कोमल…. असे विद्यार्थीने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत दिसते आहे. दि. १६ रोजी हि घटना घडली असून, नातेवाईकांनी लागलीच कोमलला रुग्णालयात दखल केले. दरम्यान उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली अशी माहिती मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली. मुजोर शासन, प्रशासन असे किती बळी घेणार असा संतप्त सवाल श्री वडजे यांनी उपस्थित केला आहे.