हिमायतनगर,परमेश्वर काळे। आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी शुक्रवारी माननीय न्यायाधीश साहेब यांच्या पथकाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा हिमायतनगर येथे आकस्मिक भेट दिली. आणि शाळा परिसर व येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल घेऊन समाधान व्यक्त केले.

यावेळेस त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम, सहाययक पोलिस निरीक्षक श्री पाटील, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम अभियंता श्री डांगे यांसह त्यांच्या पथकातील संपूर्ण सदस्य उपस्थित होते. शाळेतील आनंददायी वातावरण, शालेय स्वच्छता, स्वचछतागृह, शालेय रंगरंगोटी, डिजिटल वर्ग खोल्या, शालेय वाचनालय, शालेय पोषण आहार, पिण्याचे RO फिल्टर पाणी,प्राप्त असलेल्या सर्व भौतिक सुविधा सर्व वर्गातील चालू स्थितीतील टी.व्ही. प्रोजेक्टर, पंखे,कुलर, पाण्याची व्यवस्था,शालेय बँड पथक यांची पाहणी करून त्यानी समाधान व्यक्त केले.

शाळेतील प्रत्येक वर्गातील शिस्त आणि चुनचुनित व बोलके विद्यार्थी आणि सुंदर व स्वच्छ शालेय परिसर पाहून साहेबांना व SDM मॅडम यांना खूप आनंद झाला. शाळेतील उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्य बघून शाळेचे मुख्याध्यापक श्री.संगमनोर सर यांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यावेळी आदरणीय न्यायाधीश श्री गाडगे, एसडीएम मॅडम यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण देखील करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षकांची एकजूट, कर्तव्यनिष्ठा व काम करण्याची विशेष शैली पाहून खूप समाधान व्यक्त केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version