हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी दत्तबर्डी येथे दत्त जयंती साजरी करण्यात येत असून, दत्त जयंती निमित्त मोठी यात्रा भरत असते. नांदेड यवतमाळ हिंगोली व तेलंगणातून दत्तभक्त दर्शनासाठी येत असतात. सर्वात मोठी यात्रा दत्तबर्डी येथे दरवर्षी भरत असते यावर्षी आझाद चौक ते दत्तबर्डी कमानी पर्यंत रोडच्या दोन्ही बाजू अतिक्रमण झाले असून, दत्तभक्ताला जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. अशा आशयाची निवेदन दत्तभक्त पंजाबराव देशमुख, विठ्ठलराव सूर्यवंशी, देवराव पाटील बाभळीकर, प्रल्हाद पाटील, विलास महाजन, यांनी हादगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना लेखी दिले आहे.

26 डिसेंबर रोजी दत्त जयंती असून, त्यानिमित्त अगोदर दहा दिवसापासून दत्तबर्डी येथे दत्त भक्तासाठी दररोज धार्मिक कार्यक्रम केली जातात. या कार्यक्रमासाठी आजू बाजूच्या परिसरातून व पंचक्रोशीतील दत्तभक्त या कार्यक्रमासाठी आपली हजेरी लावतात. त्या दत्त भक्तांना दत्तबर्डी कडे जाण्यासाठी आझाद चौक ते दत्तबर्डी कमान इथपर्यंत दोन्ही बाजूच्या रोड लगत अतिक्रमण झाले. बांधकामासाठी लागणारे साहित्य रोडवरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जाण्यासाठी मोठा रस्ता असताना सुद्धा अरुंद रस्ता झाला आहे. परिणामी दत्तभक्तांना वाहन ने आन व पैदल जात असताना लहान बाळे वयस्कर नागरिक जात असतात व महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात जात असतो मार्ग फारच अरुंद झाला आहे.

त्यामुळे दत्तभक्तांना दत्तबर्डी जाण्यासाठी भयानक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच थोडा जरी धक्का लागला. तो वाद-विवाद हाणामाऱ्या व दत्तभक्त ग्रामीण भागातले असल्यामुळे ते शांत संयमी असतात. त्यामुळे हादगाव शहरातील स्थानिक नागरिक थोडा जरी धक्का लागताना त्रास दिला जात आहे. त्यातच हादगाव शहरात मोकाट जनावराचा सुळसुळाट झाला असून, ग्रामीण भागातील वयस्कर नागरिक महिला यांना त्या जनावराचा धक्का लागणे, धडक देणे अशा घटना घडत असल्यामुळे बरेच दत्तभक्त नागरिक जखमी होतात.

तसेच आझाद चौक ते दत्तबर्डी मंदिराच्या आजूबाजूस मास मच्छी याची दुकाने थाटले असून जोपर्यंत दत्तबर्डी दत्त जयंती निमित्त कार्यक्रम आहेत. तोपर्यंत ते मासा विक्रीचे दुकाने हटविण्यात यावेत व त्यांना न.पा. ठरवून दिलेल्या मच्छी मार्केट व मटन मार्केट येथे स्थलांतरित करण्यात यावे. झालेले अतिक्रमण मोकळे करून दत्तभक्तांना दत्त जयंती साठी जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. अश्या अशायाचे निवेदन हदगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी दत्तबर्डी देवस्थानचे विश्वस्त विठ्ठलराव पाटील सूर्यवंशी पंजाबराव देशमुख हादगाव डॉ देवराव नरवडे बाभळीकर विलास महाजन यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व नगरपालिका मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

हदगाव शहरातील व पंचक्रोस्थेतील दत्तभक्त यांनी प्रशासनाने लवकरात लवकर यात्रेचे कार्यक्रम आहे. तोपर्यंत तरी जाण्या येण्यासाठी आझाद चौक ते दत्तबर्डी हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी प्रशासनाला दत्तभक्त विनंती करत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version