नायगांव, रामप्रसाद चन्नावार। दि.08 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य विराट सभेची जय्यत तयारी म्हणून नायगांव व नरसी येथे बैठका संपन्न होऊन स्थळ पहाणी करून नायगांव (बाजार) येथील हनुमान मंदीर परिसरातील तब्बल 45 ते 50 एकरची जागा सभेसाठी निवडण्यात आली.

नायगांव तालुक्यातील सभेसाठी सकल मराठा समाजातील समाज बांधवांनी स्वयप्रेरणेने सभेच्या यशस्वीतेसाठी पूढाकार घेऊन मराठा आरक्षणाच्या लढयासाठी उभा रहीलेला गरजवंत मराठयांचा लढा कुठेही थंड पडणार नाही गेल्या तिन पिढयापासून मराठा समाजावरती होत असलेला अन्यायाला वाच्या फोडल्याशिवाय मराठा समाज शांत बसनार नाही.

अश्या प्रकारची ग्वाही, नायगांव, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड येथील उपस्थीत सकल मराठा समाज बांधवानी दिली व दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या सभेच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असून उद्या सकाळी 11.00 वा सहा तालुक्यातील सकल मराठा समाजाची व्यापक बैठक श्री बालाजी मंदीर सभागृह नरसी ता. नायगांव येथे आयोजीत केली आहे व ही बैठक संपल्यानंतर सभेच्या नियोजीत जागेचे भुमिपूजन श्री हनुमान मंदीर परिसर नायगांव (बा.) येथे दुपारी 12.30 वा संपन्न होईल व तसेच विविध समित्या स्थापन करून कामाची जबाबदारी दिली जाईल. तरी सकल मराठा समाज बांधवानी मोठया प्रमाणात उपस्थीत रहावे. सकल मराठा समाज नायगांव (बा.)

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version