नांदेड| नांदेड जिल्ह्यात पत्रकारितेच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती त्यावेळी येथील विद्यार्थी संभाजीनगरसह राज्यात इतरत्र पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी जात होते. अशाच नांदेडसह राज्य भरातील अनेक पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग नुकताच संभाजीनगर येथे भरला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांपैकी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग हा एक नावलौकिक मिळवलेला विभाग म्हणून पुढे आलेला आहे. या शैक्षणिक वर्षात शिकणारी विद्यार्थी आज अधिकारी, व्यावसायिक, राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून कार्य करीत आहेत.

ज्या शिक्षक गुरुजनांनी ज्ञानदानाचे कार्य करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला एक आगळावेगळा आकार देण्याचे काम केले.या सर्वांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी व मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2001 ते 2004 च्या विद्यार्थ्यांचे नुकतेच गेट-टुगेदर विद्यापीठाच्या स्वर्गवासी विलासराव देशमुख डिजिटल स्टुडिओ या इमारती मध्ये पार पडले. या कार्यक्रम प्रसंगी ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व महिला भगिनींचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुस्तक व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख डॉ. वि ल धारूरकर, प्रा सुरेश पुरी, डॉ गणी पटेल यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ सतीश दवणे, नितीन आघाव, संजय सूर्यवंशी, डॉ बालाजी शिंदे- पाटील, डॉ प्रभू गोरे, सिद्धार्थ गोदाम, भाग्यश्री नागदेवे , डॉ महेंद्र वाडे , सुनील चापुले, ज्योती स्वामी, डॉ आरती शामल, डॉ संजीवनी दिपके, दयानंद पाईकराव, नीलिमा साखरे, सुमेध पांडे, श्रीपाद सीमंतकर, डॉ संतोष धागड, डॉ विकास राऊत, सहदेव व्होणाळे , जयश्री सोनकवडे, विलास इंगळे, अलका पंडित, कैलास वाहूळ, डॉ संजय बीरंगणे, राजेंद्र अजमेरा, डॉ अश्विनी रांजणीकर, रवी गाडेकर, समीर पाठक, संजय देवकाते, प्रतिभा पाठक, गणेश गुप्ता, महेश जोशी, सतीश सोनवणे, विवेक संगे, डॉ लोपामुद्रा बनसोडे, दादा मुंडे यांची उपस्थिती होती.

गुरुजनांचा पुष्पमाला, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित मित्र-मैत्रिणींनी आपला परिचय दिला. त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन सर्वांनी फोटोसेशनचाही आनंद लुटला. आपण शिकत असताना ज्या बाकावर आपण बसलो होतो त्या बाकाची म्हणजेच बेंचची सर्वांना आठवण झाली. आणि मग सर्वांनी आपला मोर्चा विद्यमान ठिकाणी असलेल्या विभागाकडे वळवला. विभागात गेल्यानंतर त्या ठिकाणी विविध स्टुडिओला भेटी दिल्या बाकावर बसून धारूरकर सर, पुरी सर , पटेल सर यांना अध्यापन करण्याचा आग्रह धरला, त्यांनीही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून अध्यापनाचा काही वेळ आनंद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योती स्वामी यांनी केले तर आभार प्रा नितीन आघाव यांनी मांनले, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वृत्तपत्र व जनसंवाद विभागातील प्रा एस एस बिरादर , प्रा आर के वाघ , भिंगारे, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सतीश दवणे व इतर वर्ग मित्रांनी केले होते. सायंकाळी सर्वांनी जड अंतकरणाने घरी जाण्यासाठी एकमेकांचा निरोप घेतला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version