उस्माननगर। उस्माननगर ते नांदेड महामार्गावरील ढाकणी पाटी जवळ दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान किवळ्याकडून नांदेडकडे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी स्वाराने वाहनांची वाट पाहत उभे टाकलेल्या एका इसमास पाठीमागून जोराची धडक दिल्याने सदरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५२ वर्षीय इसमाची प्रकृती चिंताजनक होती ,पण दि.१८ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

लोहा तालुक्यातील किवळा येथील रहिवासी गणपती मनेजी बादवड (वय ५२) हे सिडको येथे आपल्या पत्नीसह मोलमोजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात काही कामानिमित्ताने दि.१७ रोजी ते त्यांच्या गावी किवळा येथे गेले होते त्याच दिवशी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान ते सिडकोकडे येण्यासाठी ढाकणी फाटा येथे वाहनांची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे टाकले होते त्याचवेळी किवळ्या कडून येणारी दुचाकी क्रमांक एम. एच .२६ बी.एच ७९६३ वरील दुचाकी स्वार दिगंबर विभुते यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवत बादवड यांना पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात बादवड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर विभुते हेही किरकोळ जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी सोनखेड पोलीस ठाण्याला हि माहीती दिली.

तेव्हा घटनास्थळी तातडीने सोनखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बादवड यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले तर विभुते हे नांदेड येथील यशोसाई येथे उपचारासाठी दाखल झाले.यातील जखमी गणपती बादवड यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांचा दि.१८ रोजी सायंकाळी विष्णुपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाला मयत गपपती बादवाड यांच्या पश्चात पत्नी आहेत त्यांचे दोघांचेच कुटुंब होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version