
उस्माननगर, माणिक भिसे। येथील रोजमजूरी करून संसाराचा गाडा हाकत त्याच पैशातून मुलांना शिकविणारे तुकाराम पुंडलिक भिसे यांचा मुलगा ” वेदांत तुकाराम भिसे यांने आरोग्य विभागात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ( एम.पी.डब्ल्यू ) परिक्षेत घवघवीत यश संपादन करून सरकारी दवाखान्यात एम पी.डब्लू .या पदावर निवड झाली आहे .
उस्माननगर येथील संता च्या घरात जन्माला आलेले तुकाराम भिसे यांनी सतत मेहनत कष्ट करून वेदांत ला घडवून सरकारी नोकरीचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम वेदांतने घेतले. घरातील वातावरण संतांच्या जडणघडणीत वाढलेल्या वेदांत आज सरकारी दवाखान्यात कर्मचारी बनला आहे.
काही महीन्यापूर्वी एम.पी.डब्ल्यू ही परिक्षा दिली होती ती परक्षा पास झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कोड उमरे ,उपकेंद्र कसबा ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे त्यांची नियुक्ती दि.९ मार्च रोजी करण्यात आली. ह्याचे शिक्षण १ ली ते ७ वी पर्यंत उस्माननगर येथे झाले त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर शासकीय वसतिगृहात ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण झाले व त्यानंतर नांदेड शहरात किरायाच्या खोलीत रहावून पुढील शिक्षण घेतले आहे.
त्याची जिद्द, चिकाटी,परिश्रम ,मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.ह्याच्या शिक्षणासाठी आई – वडीलांनी मदत केली व शैक्षणिक मदतीसाठी आनंदा तुकाराम घंटेवाड यांनी सहकार्य केले. वेदांत यांची निवड झाल्याबद्दल उस्माननगर येथील गावकऱ्यांच्या वतीने नुकताच आई – वडील व मुलगा यांच्या सत्काराचे आयोजन अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह उस्माननगर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर आई – वडील व मुलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक परसराम भिसे,तुकाराम भिसे , सुखदेव सोनटक्के ,प्रा.डाॅ.नागन भिसे ,प्रा.ॲड. रूपेश भिसे , सहशिक्षक दिंगबर भिसे ,ॲड.साहेबराव भिसे , अंबादास कांबळे , सोमनाथ कांबळे , ओमप्रकाश भिसे ,जिवन भिसे ,आनंदा घंटेवाड , सखाराम भिसे ,गोपाळ भिसे ,रवि भिसे , साईराज भिसे मारोती पवार , वाघमारे ,परसराम भिसे ( फेटेवाले ) लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, माणिक भिसे , यांच्या सह अनेक बांधव उपस्थित होते.
