तुम्ही गोरगरीब मराठा समाजाच्या पोरावर एसायटी लावली, येणाऱ्या काळात हाच मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल – मनोज जरांगे पाटील

नांदेड। नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवानी आयोजित केलेल्या संवाद बैठकीला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संबोधित केले. दि 4 मार्च रोजी रात्री उशीरा पार पडलेल्या मराठा समाज संवाद बैठकीला उपस्थित हजारो समाज बांधवाना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकार वर सडकून टिका केली, जर का तुमच्या दरबारी गोर गरीब मराठा समाजांनी हक्काचं आरक्षण मागितलं म्हणुन तुम्ही आमच्यावर एसायटी चौकशी लावत असाल तर येणाऱ्या काळात हेच मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी ज्या ज्या अटी शर्ती आहेत त्या सर्व निकषावर मराठा समाज आपली पात्रता सिद्ध करून सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता घटनाबाह्य व न टिकणारं 50% च्या वरचं फसवं 10% आरक्षण देऊन समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं असुन वरून आंदोलन करणाऱ्यावर एसआयटी चौकशी करने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल.
24 तारखेला राज्यभर शांततेत पार पडलेल्या रास्ता रोको आंदोलनात सुद्धा हजारो बांधवावर गुन्हे दाखल करून नाहक गोवण्याचा सरकार ने प्रयत्न केला या एक ना अनेक गोष्टीतून मराठा समाजाविषयी ची तुमची नियत काय आहे हे हळू हळू समाजा समोर येत असुन या सगळ्या गोष्टीचा हिसाब समाज करीत आहे त्याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या नक्कीच मिळणार,टप्प्यात आल्यावर जर तुम्हाला मराठ्यांचा कार्यक्रम करायचा असेल तर मराठे सुद्धा तुम्हाला टप्प्यात गाठून कार्यक्रम करतील मुख्यमंत्री साहेब थोडं थांबा असा जळजळीत ईशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भाषणातून दिला.
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्या शिवाय एक इंच ही मागे हटणार नाही, फक्त तुमची एकी कायम ठेवा असे भावनिक आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. सदरील संवाद बैठकीचे रूपांतर हे भव्य सभेमध्ये झाले, महिलासह हजारो समाज बांधव हे रात्री उशीरा पर्यंत आपल्या संघर्ष योद्ध्याचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे सुचिता जोगदंड आणि मुरलीधर हंबर्डे यांनी केले व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
