हिमायतनगर,परमेश्वर काळे। शेतकरी व्यापारी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या मोकाट जनावरावर आळा घालण्यासाठी कोंडवाडा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन नगरपंचायत विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा माधव किशनराव शिंदे, तालुकाध्यक्ष राजे प्रतिष्ठान हिमायतनगर जि. नांदेड यांनी एका निवेदनातुन दिला आहे.
हिमायतनगर शहराला नगरपंचायतीच्या दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी असलेला जुना कोंडवाडा मागील पंचवार्षिक काळात गायब झाला आहे. त्यामुळे शहर व परिसरात फिरणाऱ्या मोकट जनावरांचा बंदोबस्त करणे जिकरीचे बनले आहे. ही मोकाट जनावरे शहर परिसरातील आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांची शेतात बिनधास्तपणे वावर करून शेती पिकाचे नुकसान करत आहे. अगोदर शेतकरी अतिवृष्टी व उत्पादन कमी होत असल्याने हैराण झाले आहेत. त्यातच अशा मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण होत आहे. केवळ शहरात कोंडवाडा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
शहरात मोकाट जनावराचे प्रमाण अधिक वाढल्या कारणाने गावकरी व शेतकरी बांधवाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. काबाड कष्ट करून सावकारी व बँकेचे कर्ज काढून शेतात पेरणी करतात. ते पीक हाताशी येताच मोकाट जनावर ते भोई सपाट करून टाकतात. हिमायतनगर शहरात कोंडवाडा नसल्यामुळे शहरातील नागरिक व शेतकरी बांधव चिंतेत आहेत. तसेच बी मोकाट जनावरे दिवस बाजारपेठ व फळांच्या दुकानावर देखील ताव मारत आहेत. शहरात कोंडवाडा नव्हता असे नाही तो प्रशासनच्या जागेत होता. पण काही भूखंड माफीयानी त्यावेळेस ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्याला हाताशी धरून आर्थिक देवाण- घेवाण करून त्या कोंडवाड्याचे सर्व पुरावे नष्ट करून टाकले.
ही बाब लक्षात घेता प्रशासनाने हिमायतनगर शहरात कोंडवाडा उभारून मोकाट जनावराला आळा घालावा व शहरातील गावकरी व शेतकरी बांधवाला चिंतामुक्त करावे जर प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राजे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व शेतकऱ्यासोबत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल या आंदोलना नंतर होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी ही नगरपंचायत प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनात तुन दिला आहे. या निवेदनाच्या प्रति तहसील कार्यालय हिमायतनगर, उप विभागीय कार्यालय हादगाव, खासदार हेमंत पाटील, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, व पत्रकार मंडळींना देण्यात आले आहे.