उस्माननगर। करुणेचा महासागर ,मातृत्वाचे महाकाव्य , महामानवांची सावली , कोट्यावधी लेकरांची माऊली , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली …उर्जायनी ,त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उस्माननगर येथील अण्णा भाऊ साठे विचार मित्र मंडळाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा कार्यकर्ता तथा डी .पी .आय. जिल्हाध्यक्ष( ग्रा.) नांदेडचे तेजसकुमर भिसे , रवि भिसे , सुनिल भिसे , अनिल भिसे , गंगाप्रसाद वाघमारे ,अरविंद भिसे , सोमनाथ भिसे , गजानन भिसे ,बंटी भिसे , मारोती वाघमारे , साहेबराव भिसे , नागेश पकानभेद ,ॠषिकेश भिसे ,अतुल भिसे , रत्नाकर भिसे , साईराज भिसे , पृथ्वीराज भिसे , दिपक वाघमारे , बबलू ,यांच्या सह मित्र मंडळ उपस्थित होते.
सम्राट अशोक प्राथमिक शाळेत अभिवादन
येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत सकाळी त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे , मन्मथ केसे, भगवान राक्षसमारे, देविदास डांगे, सिध्दोधन नितीन लाटकर, समता जोंधळे ,सौ.रोहिणी सोनकांबळे , भालेराव , शेख शकील, यांच्या सह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.