हिमायतनगर| शहरातील रेल्वे स्थानक नजीक असलेल्या शेत सर्वे नं. 169/2 व शेत सर्वे नं. 174 मधुन गेलेल्या विद्दुत तार संबंधितांचा मोबदला मिळून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
हिमायतनगर रेल्वे स्थानकांच्या वीज लाईनचे काम करताना परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतून पोल गेले आहेत. हे पोल टाकताना रेल्वे विभागाने मोबदला देण्याचे मान्य केले होते. यास एक वर्षे झाले आमच्या शेतातील पिकाचे नुकसान करुन आजपर्यत आम्हाला कुठलाही पिकांच्या मोबदला व जमिनीचा मोबदला मिळाला. यामुळे हिमायतनगर येथे आलेल्या रेल्वे डिवीजन मेनेजर नांदेडच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार याना शेतकरी संतोष नारायण माने, लक्ष्मीबाई दाजीबा कन्हाळे, विशाल विलासराव वानखेडे, राजीव गाजेवार यांनी निवेदन देऊन मोबदला मिळवून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीमाळ, भाजपा युवामोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गोविंद गोडसेलवार, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे, अनिल मादसवार, संजय माने, संतोष गाजेवार, वामनराव मिराशे, गजानन हरडपकर, साहेबराव चव्हाण, पापा पार्डीकर आदींसह गावातील जागरूक नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.