नांदेड| मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 07/11/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार हे नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन त्यांनी संशयीत इसम नामे अनिकेत ऊर्फ सोनु पिता सदाशिव वुक्तरे वय 21 वर्ष व्यवसाय वेकार रा. इंदीरानगर, वाडी (बु) ता. जि. नांदेड यास ताब्यात घेवुन मिळालेल्या माहीतीप्रमाणे त्याचेकडे सखोल तपास केला असता, त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या कंपनीच्या (04) चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचे मोटार सायकल त्याने नांदेड शहरातुन व पुणे येथुन चोरी केल्याचे सांगीतले आहे. मिळुन आलेल्या मोटार सायकल चे वर्णन खालील प्रमाणे आहे.
वर नमुद इसमाकडुन वेगवेगळ्या कंपनीच्या एकुण 04 मोटार सायकल एकुण किंमती 3,05,000/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे. त्यावरुन पोलीस ठाणे भाग्यनगर चा 01 गुन्हा व पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे ता. जि. पुणे येथील 01 गुन्हा असे एकुण 02 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस ठाणे भाग्यनगर गुरनं. 375/2023 कलम 379 भा द वि गुन्हयाचे तपासीक अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. ते सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड सपोनि / रवि वाहुळे, पोउपनि / सचिन सोनवणे, पोहेकॉ / गुंडेराव करले, अफजल पठाण, वालाजी तेलंग, पोना / संजिव जिंकलवाड, देवा चव्हाण, ज्वालासिंघ बावरी यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.