मुंबई| भारतीय जनता पक्ष वाहतूक सेल व भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख पदी श्रेष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते सखाराम कुलकर्णी यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी करून नुकतेच दिनांक 12 डिसेंबर रोजी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
भारतीय जनता पक्षाने ट्रक, ऑटो, टेम्पो ,स्कूल बस, रिक्षा यांचे वर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे तसेच प्रादेशिक परिवहन, पोलीस यांच्याकडून विनाकारण अडवणूक करून दंड लावणे पैसे वसुली या प्रकारावर वचक, आळा बसण्यासाठी भाजपा वाहतूक सेलची स्थापना केली आहे .याचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख, सरचिटणीस निलेश निम्हण व कार्याध्यक्ष प्रवीण आखाडे असून आमदार आशिष शेलार हे प्रभारी आहेत. वाहतूकदारांना समाजामध्ये सन्मान मिळवून देणे या समाजाच्या अडचणी दूर करणे यांची काळजी घेणे हे या सेलचे कार्य आहे.
सखाराम कुलकर्णी यांचे सामाजिक कार्य व संघटन कौशल्य याचा विचार करून या भाजपा वाहतूक सेलच्या मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख पदी यांची नियुक्ती करून नियुक्तीचे पत्र दिनांक 12 डिसेंबर रोजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सखाराम कुलकर्णी यांना दिले. व संघटना वाढीस तसेच पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.सामाजिक कार्याची आवड असून कुलकर्णी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. या नियुक्तीमुळे सखाराम कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होऊन यांचेवर त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक यांचे कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.