नांदेड| झारखंड राज्यातील काँग्रेसचे खा. धीरज प्रस्ताव शाहू यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला असून 353 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. रोखड तपासण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कमी पडले. मशीन बंद पडल्या. या कारवाईने काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड झाला असल्याची टीका भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी पत्रकार परिषदेत केली.

6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि समुहाच्या झारखंड आणि ओडिशा मधील 10 ठिकाणी छापे टाकले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकून 353 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कमी पडले. मशीन बंद पडल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. बॅंकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर कारवाई पुर्ण झाली. या कारवाईत 353 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. यावरुन काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.

राज्यसभेची खासदारकी ही राजकारणाच्या पलीकडे सुध्दा माणसाची गुणवत्ता पाहून दिली जाते.पण दारुच्या व्यवसायात असणाऱ्या आणि ज्याच्या अनेक बेकायदेशीर व्यवसायातून अमाप संपत्ती कमवणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी का दिलेली असेल,याचा विचार जनतेने करावा. परंतु काँग्रेसने कायम अशा भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घातलेलं आपल्याला दिसून येईल. युपीए सरकारच्या 10 वर्षाच्या काळात भ्रष्टाचार सुरू तसाच भ्रष्टाचार अजून ही सुरुच आहे.कोळसा घोटाळा,2G घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये केलेला भ्रष्टाचार जनता अद्याप विसरली नाही. महाराष्ट्रातील महावीर आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री 100 कोटींचा हप्ता मागितला होता. त्या हप्त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात आला. हीच काँग्रेसच्या राजकारणाची पध्दत राहिलेली आहे.

देशात लुबाडणारा काँग्रेसचा ‘ हात ‘ आहे आणि देशात विकासाची भरभराट करणार भाजपाच ‘ कमळ ‘ आहे. देश स्वतः ची वैयक्तीक ATM असल्यासारखा या काँग्रेसच्या नेत्यांनी लुटला आहे. यावरुन भारतातील जनतेला युपीए व भाजप सरकार मधील फरक लक्षात आलेला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन नुकत्याच तीन राज्यांतील जनतेने काँग्रेसला नाकारत भाजपाला प्रचंड बहुमत दिले. याचे मुख्य कारण काँग्रेसच्या मनमानी, अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मोदींच्या गॅंरटीवर विश्वास आहे. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गॅंरटी असते आणि जिथे भाजपाची सत्ता असते तिथे विकासाची म्हणजेच मोदींची गॅंरटी असते, असेही कंदकुर्ते म्हणाले. या वेळी प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version