नवीन नांदेड। परभणी येथे पार पडलेल्या माजी मंत्री ॲड. गणेशराव नागोराव दुधगावकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुहानी उत्तम पवार या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. नांदेडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या सुहानी उत्तम पवार हिचा या पुरस्काराबद्दल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

प्रारंभी ही फक्त स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. त्यात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या नऊ स्पर्धकांची मंचावर अंतिम फेरीत वक्तृत्व स्पर्धा पार पडली. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सुहानी उत्तम पवार या विद्यार्थिनीने या स्पर्धेत राज्यस्तरावर उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवत महाविद्यालयाचा गौरव वाढवला. ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या हस्ते या पुरस्काराबद्दल सुहानी पवार हिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ.अनिल गच्चे,प्रा.डॉ.व्ही.आर. राठोड, भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील प्रा.डॉ.जे.टी. जाधव,प्रा.डॉ.नागेश कांबळे, अधीक्षक आर.डी. राठोड आदींची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version