नांदेड| वर्षावासाच्या पवित्र तीन महिन्यांमध्ये बौद्ध उपासक-उपासिकांनी उपोसत धारण करत असताना अष्टशिलाचे पालन करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत आहोत. असे उद्गार पुज्य भंते बोधीधम्मो (चैत्यभूमी मुंबई तथा संस्थापक बुद्धभुमी गोळेगाव) यांनी लोहा तालुक्यातील जवळा (दे) याठिकाणी भा.बौ. म.स.जि.संरक्षण सचिव तथा आकाशवाणी प्रा.निवेदक आनंद पुरभाजी गोडबोले यांच्या निवासस्थानी धम्मदेसना देताना काढले.
पवित्र अशा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास सुरु असुन, यावेळी लोहा तालुक्यातील जवळा (दे) येथील श्रध्दावान बौद्ध उपासक आनंद पुरभाजी गोडबोले यांच्या निवासस्थानी भोजन दान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुज्य भंते बोधीधम्मो यांच्या आगमनाप्रसंगी पुष्पानी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाकारुणीय तथागत गौतम बुद्ध आणि परमपपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सुभाष खाडे (भा.बौ. म.स.जि.संघटक नांदेड), तुकाराम खिल्लारे (भा.बौ.म.स. लोहा ता.सं.सचिव) यांच्या हस्ते पुज्या करण्यात आली.
त्यानंतर श्रध्दावान बौद्ध उपासक उपासिका व उपोसत धारकांनी आदर्शांची पुष्प पुजा करुन भंतेजीना वंदन केले. व उपासक उपासिका यांनी भंते यांना याचना केली. व त्यानंतर भंतेजीनी त्रिशरण पंचशील यांसह परित्राण देवुन आशिर्वाद दिले. व गोडबोले परिवाराकडुन भोजन दान करण्यात आले. व उपासक उपासिका यांना खिरदान करण्यात आले.
त्यानंतर पुज्य भंते बोधीधम्मो यांनी सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त केली आणि सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांना धम्मदेसना दिली. यावेळी वर्षावासाच्या पवित्र महिन्यांमध्ये दान केले पाहिजे. आणि आष्टी शिलाचे पालन केले पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व उपोसत धारकांच्या श्रध्देचे कौतुक करुन, प्रत्येकांनी दान करावे. आपल्या धम्मात दानाला भगवंताच्या काळापासून फार महत्त्वाचे स्थान आहे असे सांगितले.
यावेळी पांडुरंग गोडबोले,रावण गोडबोले, सखाराम गोडबोले, हिरामण गोडबोले, सुंदराबाई पुरभाजी गोडबोले, आकांक्षा आनंद गोडबोले, विशाल गोडबोले, सुरेश गोडबोले, मिलिंद बाबुराव गोडबोले, सुरज गोडबोले, रत्नदिप गच्चे, सुलोचनाबाई गच्चे, सारिका गच्चे, मनिषा गच्चे, मिनाक्षी विलास गोडबोले, वैजंताबाई गोडबोले, छाया विनोद गोडबोले, आर्या, अपेक्षा, प्रतिक्षा, आकांक्षा, अजिंक्य, आशिष,विश्वजित, विश्वास, चरण, प्रणिता, गुणगुण, बंट्या, रक्षिता यांसह उपासक उपासिका व बालक बालिका यांची उपस्थिती होती.