विश्व हिंदू परिषद श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको यांच्या वतीने भव्य शोभायात्रा ऊत्साहात,अनेक ठिकाणी स्वागत
नवीन नांदेड। श्री हनुमान जन्मोत्सव हिंदु एकता दिवस निमित्ताने २३ एप्रिल रोजी भव्य शोभायात्राचे आयोजन हडको येथील विठ्ठल मंदीर ते काळा हनुमान मंदीर संभाजी चौक सिडको येथे करण्यात आले होते.
यावेळी या शोभायात्रेचे विविध ठिकाणी सामाजिक संघटना,व्यापारी प्रतिष्ठान यांनी पुष्प वृष्टी करून तर अनेक महिलांनी उत्सव मुर्ती पुजन करून स्वागत केले,या शोभायात्रेत ढोलताशांच्या गजरात तर नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक विकास परदेशी यांच्या संचाने विविध भजने सादर केली,युवक महिला,पुरूष यांनी ऊत्सफुर्त सहभाग नोंदविला.लहान अनेक बालकांनी हनुमान यांची सजीव देखावा सादर केला होता.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषद श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको यांच्या वतीने भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून या भव्य शोभायात्रेत आकर्षण श्री हनुमानजीची सुंदर मूर्ती, ढोल पथक,अयोध्या मधील प्रभू श्री रामचंद्र चे सिडको हडको वासियांना दर्शन हुब हुब सुंदर मूर्ती,मतदान जनजागृती, सनात जनजागृती ,सुप्रसिद गायक श्री विकास परदेसी यांचा भजनाचा संच सहभागी झाला, हि यात्रा हडको विठ्ठल मंदीर येथुन सायंकाळी ५ वाजता निघाली सिडको मुख्य मार्गावरून काळा हनुमान मंदीर संभाजी चौक येथील दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर येथे संपन्न झाली.
भव्य शोभा यात्रेत सिडको हडको भागातील सामाजिक राजकीय व महिला पुरुष,युवक यांच्या सह अनेक बालकांनी सहभागी नोंदविला, रामजी कि निकली स्वारी या लोकप्रिय गिरासे अनेक भजनावर व ढोल ताशांच्या गजरात तरूणांनी जयघोष केला, दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर येथे या यात्रेच्या समारोप महाआरती करून करण्यात आला, हि शोभा विश्व् हिंदु परिषद श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.