किनवट । किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस किर्तीकेएन हे सात डिसेंबर रोजी सकाळी शासकीय कामानिमित्त नांदेड दौऱ्यावर जात असताना हिमायतनगर येथून इस्लापूर कडे गिटी भरून विनापरवाना अवैद्य वाहतूक करताना एक टिप्पर आढळल्याने किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस कीर्तीकेएन यांनी टिप्पर क्रमांक एम एच 32 क्यू 1961 या टिप्पर चालकास गिट्टी वाहतूक परवान्याची विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठलाच वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी एस किर्तीकेयन यांनी टिप्पर चालकास थेट इस्लापूर पोलीस स्टेशनमध्ये टिप्पर लावण्यास सांगितल्याने गौण खनिज अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडालीय..
किनवट तालुक्यातील बहुतांशी क्रेशर मशीन बंद असल्या कारणाने हिमायतनगर येथील सुरेश पळशीकर यांच्या टीप्परणे गिटी वाहतूक परवाना न घेता अवैधरित्या गिटीची वाहतूक करत इस्लापूर कडे येत असताना टिप्पर आढळून आल्याने याप्रकरणी इस्लापूर येथील तलाठी वसमतकर व मंडळ अधिकारी गाडे यांनी गौण खनिज प्रकरणी सदरील वाहनाचा पंचनामा करून अहवाल महसूल विभागाकडे सादर केल्याने रेतीची व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती केयन यांच्या या कारवाईमुळे इस्लापूर भागातील गौण खनिजाची अवैध्य वाहतूक करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतलाय.
याच प्रकारच्या कारवाया तेलंगणा मधून रेती तस्करी व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दंडात्मक कारवाया केल्यास महसूल विभागाच्या तिजोरीत अजून भर पडेल हे मात्र तितकेच खरे