हनुमान जन्मोत्सव सिडको हडको परिसरात ऊत्साहात साजरा

नवीन नांदेड। हनुमान जन्मोत्सव सोहळा सिडको हडको परिसरातील विविध हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला. यावेळी जय बजरंग बली की जय, घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर हडको येथील शनिमंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात व सिडको येथील संभाजी चौक परिसरातील दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व जन्मोत्सव ऊत्साहात साजरा करण्यात आला.
२३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परिसरातील अनेक मंदिरावर रोषणाई व सजावट करण्यात आली तर सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन सिडको हडको परिसरातील विविध हनुमान मंदिरात करण्यात आले, प्रारंभी सकाळी विधीवत पुजन, महाअभिषेक, महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.
काळा दक्षिण हनुमान मंदिर संभाजी चौक येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आयोजित महोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह यांच्या समारोप २३ एप्रिल रोजी हभप भास्कर बुवा कामारीकर यांच्या काल्याचा किर्तन सोहळयाने व महाप्रसादाने झाला.
दि. १६ ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दक्षिणमुखी काळा हनुमान भक्त मंडळी, आदर्श युवक मंडळ संभाजी चौक, सिडको घेतले, ईच्छा पुरती हनुमान, बिजली हनुमान,ऊस्मानगर,रोड ,दत मंदिरात असलेल्या हनुमान मुर्ती विधीवत पुजन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले,यासह परिसरातील अनेक हनुमान मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा झाला.
हडको येथील शनिमंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने सामुदायीक महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते, यावेळी अजिवन अन्नदाते, यजमान यांच्या विश्वस्त समिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी महाप्रसाद लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.
