हिमायतनगर, अनिल मादसवार। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबात म्हणून हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील गावकऱ्यांनी गेल्या 26 दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला आज वाघी ग्रामपंचायतीने पाठिंबाचा ठराव देऊन अंदाजे 34 जणांनी या साखळी उपोषणात सहभाग नोंदविला असल्याने एकापाठोपाठ एक गाव व मराठा समाज बांधव मराठा आरक्षण मिळावं यासाठीचा लढा तीव्र करत असल्याचे दिसते आहे. आतातरी सरकारने मराठा आरक्षण जाहीर करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी उपोषणातून होत आहे.

गेल्या 26 दिवसापासून कामारी गावात मराठा आरक्षण मिळावं म्हणून दत्ता पाटील हडसणीकर आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान सुदर्शन देवराये नामक युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने गळफास घेऊन समाजासाठी प्राणाची आहुती दिली, तेंव्हापासून कामारी येथील साखळी उपोषणाला अनेक आजी माजी राजकीय पदाधिकारी यांनी भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची आशा बळावली आहे. दरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कामारी गावास भेट देऊन समाजाचा योद्धा गेल्याची खंत व्यक्त करत आरक्षण तर मिळणार आहे, मात्र कुणीही आत्महत्या सारखा टोकाचं पाऊल उचलू नये असे आवाहन केले होते.

तेंव्हापासून कामारी व सर्कल परिसरातून मोठया प्रमाणावर समाज बांधव आणि ईतर समाजाचाही मराठा आरक्षणाला पाठींबा मिळत आहे. आज कामारी गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा 26 वा दिवस सुरू आहे. या उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून वाघी येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच इतर सर्व सहकारी व ( सकल‌ मराठा बाधव) अश्या 34 लोकांनी आजच्या साखळी उपोषणात सहभागी होऊन, आज दिवस आणि रात्रभर साखळी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. तसेच त्यांनी दि30 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या एक मताने ठराव घेतलेली प्रत देऊन पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल समस्त कामारी गावकऱ्यांच्या वतीने सर्व वाघी येथील सकल मराठा समाजाचे जाहीर आभार‌ मानले ‌.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version