नांदेड| हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.कलाम यांची जयंती व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आज नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता तरोडा सेंटर येथे दोन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.

आज नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता तरोडा सेंटरच्या वतीने भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष व अधिस्विकृती समिती लातूर विभागाचे अध्यक्ष विजय जोशी व दैनिक लोकमतचे जिल्हा वितरण व्यवस्थापक गोविंदराव खंदारे व लक्ष्मीकांत पवार यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक नामदेवराव कटकमवार, बाबुराव थोरात व ज्ञानोबा नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विजय जोशी व गोविंदराव खंदारे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे समाजात किती महत्व आहे. व त्यांची सकाळी उठल्यापासूनची लगबग तसेच प्रत्येक वाचकांपर्यंत सकाळी लवकर वृत्तपत्र पोहंचविण्याची धडपड असते. त्यामुळे वितरकांच्या व हॉकर्स मंडळींचा निश्चितच सहभाग महत्वाचा आहे. यानिमित्ताने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, अशा भावना व्यक्त केल्या. लक्ष्मीकांत पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या तसेच आजच्या दिवसाचे महत्व समजावून सांगितले.

याप्रसंगी नामदेवराव कटकमवार, लक्ष्मीकांत पवार, बाबुराव थोरात, ज्ञानोबा नरवाडे, संजय पाटील, प्रशांत धाडपाडे, राजेश्वर लोकरे, संदेश नरवाडे, मारोती गायकवाड, योगेश मुर्वेâवार, नागेश मुर्वेâवार, नागनाथ वंगावार, विजय कल्याणकर, बालाजी पावडे, राजू वगलवार, हरिभाऊ बुक्तरे, संजय चल्लींरवार, शिवाजी एकलारे, मनोज सुर्यवंशी, देविदास कवठेकर, वैâलास पेन्सलवार, राजेश राचा, केरबा आणेराव, बालाजी नागरगोजे, स्वप्नील बैनवाड, अरविंद सोनकांबळे, ज्ञानेश्वर पांचाळ, मनोज सूर्यवंशी, गणेश अनंत्रे, गणेश कल्याणकर, देवानंद कल्याणकर, केदार कल्याणकर, प्रशांत कल्याणकर, राहुल हिंगोले, रवि गच्चे, मारोती गायवाड, हनमंत माऊली, ऋतिक जाधव, प्रेम पवार, विश्वजित धुतमल, बाळा पवार, चेतन चौधरी, मोरे सोनखेडकर, प्रणव बुक्तरे, अविनाश कांबळे, योगेश कदम, साई मोकले आदींची उपस्थिती होती.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version