नांदेड| दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, शौचविधीहून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापुर्वी इत्यादी बाबीसंदर्भात लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावस्‍तरावर प्रयत्न करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाने दिली आहे.

दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, गाव, शाळा व अंगणवाडीतून हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक केले जाणार आहे. विशेष: शालेय स्तरावर मुलांना हात धुण्याच्या पध्‍दती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात जाणार आहे. तरी जागतिक हात धुवा दिवस ग्रामपंचायतीसह सर्व पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात साजरा करण्‍याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याणच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version