उमरखेड,अरविंद ओझलवार| तालुक्यात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर मधील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अचानक आलेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचा नागरिकांची तारांबळ उडाली होती गारांच्या तडाख्याने अनेक जनावरे जखमी झाली तर तूर हरभरा गहू व ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले .
आज दि .अकरा रोजी दुपारनंतर मराठवाड्याकडून तालुक्यातील मत खंडातील बोरी ( चा), कोप्रा (बु) ,चातारी माणकेश्वर , सिंदगी , बाम्हणगाव तर बंदीभागातील सावळेश्वर ,मुरली , जेवली, सोनदाबी ,चिखली ,कोरटा , दराटी या गावावर अचानक अवकाळी पाऊसा सह गारपीट सुरू झाली .या अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची पुरती तारांबळ उडाली .दुपारनंतरची वेळ असल्याने सर्व जनावरे खुल्यावर होती त्यामुळे घराच्या तडाख्यातून अनेक जनावरे जखमी झाली यामध्ये अनेक घरांची सुद्धा नुकसान झाल्याची समजते तसेच खुल्या वर ठेवलेले धान्याची व साहित्याची सुद्धा नुकसान झाले .या गारपिटीचा सर्वात जास्त फटका तालुक्यातील मतखंडातील चातारी कोपरा बोरी व माणकेश्वर या गावांना बसला असून गहू हरभरा ज्वारी पिके पूर्णतः उध्वस्त झाली तर कापून ठेवलेल्या तूर पिकाच्या झाडण्या झाल्या . तर जनावरांच्या अंगावर गार पडल्याने संपूर्ण शरीरावर गाठी आल्या तर काही जनावरे रक्तबंबाळ झाली .
आजच्या गारपिटीने शेतकऱ्यांच कधी न भरून निघणारे नुकसान असून सरकारने तात्काळ सदर नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट तात्काळ नुकसान भरपाई द्यावी . रितेश कदम… शेतकरी कोपरा ( बु)
मत खंडातील बोरी चातारी माणकेश्वर व कोपरा या गावात पावसाळ्यात ढगफुटी झाली होती त्यामुळे खरीप हंगाम पूर्ण हातातून गेला होता .या रब्बी पिकावर शेतकऱ्यांची आशा होती परंतु गारपिटीने ही आशा सुद्धा मावळल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे . तालुक्यातील बऱ्याच गावात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या असून उद्या सकाळपासून सर्वेक्षण करण्यात येईल, नामदेव ससाने, आमदार उमरखेड