नायगाव, रामप्रसाद चन्नावार। लोहगाव येथील गुंड प्रवृत्तीचे व दरोडेखोर सुशील सिंघनवाड व व्यंकट माळी साईनाथ सिंघनवाड दीपक अनंतवाड व अन्य आठ ते दहा व्यक्तींनी कुंभारगाव येथील मारुती शेळके व हुसा येथील अंकुश वाघमारे या दोघांना बेदम मारून सोन्याची अंगठी मोबाईल घेऊन त्यांना बेदम मारहाण करून गंभीर स्वरूपाच्या जखमी करण्यात आले आहेत

सदर घटनेत मारुती शेळके यांना लोखंडी रॉड च्या साह्याने व प्लास्टिक खुर्चीच्या साह्याने मारहाण करून डोक्यात गंभीर स्वरूपाचा मार असून मारुती शेळके यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. तर अंकुश वाघमारे यांना सहा ते सात जणांनी मिळून बेदम मारहाण करून दगडाने पाटीत व मानेवर ठेचून बेशुस्त अवस्था करून त्यांना रस्त्याच्या बाजूला फेकण्यात आले आहे.परिणामी या घटनेत अंकुश वाघमारे व मारुती शेळके हे गंभीर जखमी झाले असता त्यांना नांदेड येथील निर्मल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून, त्यांना आयुष्य मध्ये तब्ब्ल दोन ते तीन दिवस उपचार करून त्यांना रामतीर्थ पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्यांच्या समक्ष सदर गुन्हेगारावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी घटनेची चौकशी करून संबंधितावर भारतीय दंड संहिता 1860 अधिनियमानुसार 324, 326, 323, 504, 506,427,34, अन्वेये दिनांक 6 10 2023 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर यातील संशयित असलेले यांचा तपास पीआय संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली मा शेख साहेब यांनी तपास करीत आहेत. सदर गुंड प्रवृत्तीचे लोक हे बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील असून या दोघांना एवढे बेदमपणे मारहाण करण्याचे काय कारण असेल हे अद्याप समजू शकले नाही.

सदर घटना घडवून चार-पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी अजून जेरबंद करण्यात आले नाही, तरी सर्व आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावे. अशी नातेवाईकांची मागणी आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version