
हिमायतनगर। तालुक्यातील सोनारी फाट्यावर दुचाकीस्वाराची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जन ठार तर एक जन गंभीर जखमी झाला आहे. हि घटना दि. २३ मे रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
हिमायतनगर, भोकर राज्य रस्त्यावर अपघाताची मालिका संपता संपेना अशी झाली आहे. सिमेंट काँक्रीट रस्ता सोयीचा झाला मात्र अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्ता चांगला झाल्याने वाहणे सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हिमायतनगर कडून सिंधी येथील युवक हा एम. एच. २६ सी. बी. ५७७९ स्पलेंडर दुचाकीवरून भोकर कडे जात होते तर एम. एच. २६ सी. डी. ९२७४ होन्डा शाईन घेऊन दोघेजण हिमायतनगर कडे येत होते.
दरम्यान सोनारी फाट्या जवळ दोन्ही दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक झाली. घटनेची माहीती मिळताच सोनारी येथील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्याची तयारी करून उपचारांसाठी नेत असतानाच रस्त्यातच वैभव राजू गोरे रा. सिंधी ता. उमरी जि. नांदेड याचा मृत्यू झाला. तर दि. २४ मे रोजी. बालाजी ढोले रा. एकघरी ता. हिमायतनगर जि. नांदेड याचा उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला आहे. मयत बालाजी ढोले यांचेवर दि. २५ शनिवारी सकाळी अकरा वाजता मौ. एकघरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तर या घटनेत गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहीती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, जमादार अशोक सिंगणवाड इतर पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक सिंगणवाड हे अधिक तपास करीत आहेत.
