नांदेड| महाराष्ट्र राज्य हिवताप/ हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्था म.नांदेड येथिल सेवा सहकारी सोसायटी निवडणूक जाहीर झालेली असून या निवडणुकीत नांदेड जिल्हातील 27 उमेदवार रिंगणात असून एकूण दोन पॅनल समोरा समोर या निवडणूकीत उभे आहेत.
गेल्या काही दिवसा पासून प्रचार दोन्ही बाजून जोरात चालू असून त्यात प्रचारा मध्ये विविध पातळीवर रंगत आलेली आहे.यामध्ये साहित्यिक,विजय चव्हाण यांनी वेगळ्या विचारातून वैचारीक बदल घडविण्यासाठी नवीन वाटचाल करण्यासाठी गुलाब ही निशाणी घेवून वेगळ्या संकल्पनेतून या निवडणूकीत उभे टाकलेले आहेत.नवीन,आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे सर्व कर्मचारीवर्ग पाहत आहेत. त्यांच्या शांत,संवेदनशिल स्वभावाच्या कामकाजा मुळे विजय चव्हाण यांना नांदेड सह हदगाव,भोकर,किनवट,धर्माबाद,बरबडा,कंधार,उमरी अर्धापुर अशा विविध तालुक्यातील कर्मचाऱ्याकडून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शांत,संयमाने व वैचारीक पध्दतीने ते प्रचाराची मांडणी करत असल्यामुळे प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे जागरुक मतदाराचां त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा ही मिळत आहे.श्री कैलाश सावळे,संजय भोसले,सी.पी.नातेवार,राजकुमार इंगळे,विलास नाईक,भिमराव राठोड,बाबुराव सावळे आदी प्रचाराचा धुरा सांभाळत आहेत.महाराष्ट्र राज्य हिवताप/ हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्था म.नांदेड येथिल निवडणुकीचे मतदान दि.22/10/2023 रोजी रविवार या दिवशी मगनपुरा नांदेड येथिल सोसायटी कार्यालयात होणार आहे.